Join us  

SRH vs RCB Latest News : एबी डिव्हिलियर्सची चौथी धाव ठरली विक्रमी; ट्वेंटी-20त फक्त आठ फलंदाजांना जमला हा पराक्रम!

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचं आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 31, 2020 8:22 PM

Open in App

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचं आहे. त्याच निर्धारानं मैदानावर उतरलेल्या SRHनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला सुरुवातीला धक्के दिले. संदीप शर्मानं ( Sandeep Sharma) RCBला दोन धक्के देत अडचणीत आणले. पण, जोश फिलिफ व एबी डिव्हिलियर्स यांनी डाव सावरला. एबीनं चौथी धाव घेताच एका विक्रमाला गवसणी घातली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत ८ फलंदाजांना हा विक्रम करता आला आहे.

संदीप शर्मानं तिसऱ्या षटकात देवदत्त पडीक्कलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पाचव्या षटकात विराट कोहलीला त्यानं केन विलियम्सनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. RCBचे दोन फलंदाज २८ धावांवर माघारी परतले होते. संदीपनं या विकेटसह आयपीएलमध्ये विराटला सातव्यांदा बाद केले. आयपीएलमध्ये विराटला यापूर्वी आशिष नेहरानं ( ६) सर्वाधिक वेळा बाद केले होते. संदीपनं तो विक्रम मोडला. याचसह त्यानं IPLमध्ये एकाच फलंदाजाला सर्वाधिक ७ वेळा बाद करण्याच्या झहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी केली. झहीरनं ७ वेळा महेंद्रसिंग धोनीला बाद केले आहे.

देवदत्त व विराट माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेल्या एबीनं चौथी धाव घेताच ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा पल्ला पार केला. ही कामगिरी करणारा तो ८वा फलंदाज ठरला. एबी डिव्हिलियर्स २४ धावा करून शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

ट्वेंटी-२० सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  1. ख्रिस गेल - ४१०सामने, १३,५७२ धावा
  2. किरॉन पोलार्ड - ५२४ सामने, १०,४२५ धावा
  3. शोएब मलिक - ४०१ सामने, १०,१४५ धावा
  4. ब्रेंडन मॅकलम - ३७० धावा, ९९२२ धावा
  5. डेव्हिड वॉर्नर - २९४ सामने, ९७१२ धावा
  6. विराट कोहली - २९३ सामने, ९३२४ धावा
  7. आरोन फिंच - २९८ सामने, ९२७५ धावा
  8. एबी डिव्हिलियर्स - ३२२ सामने, ९०००* धावा
टॅग्स :IPL 2020एबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद