Join us  

SRH vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सचा 'Super' विजय, चौथ्या स्थानावरील पकड मजबूत

IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या ल्युकी फर्ग्युसननं सुपर ओव्हरमध्येही दोन विकेट घेत KKRच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 7:56 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर KKRनं ५ बाद १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात SRHला केन विलियम्सन व जॉनी बेअरस्टो यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण, ल्युकी फर्ग्युसननं तीन धक्के देताना KKRला कमबॅक करून दिले. कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) आज SRHसाठी मॅच फिनिशरची भूमिका बजावली. पण, कोलकातानं हैदराबादला ६ बाद १६३ धावांवर रोखले आणि सामना Super Over मध्ये गेला. IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या ल्युकी फर्ग्युसननं सुपर ओव्हरमध्येही दोन विकेट घेत KKRच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. 

राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRला सावध सुरुवात करून दिली. पण, पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर टी नटराजननं KKRला पहिला धक्का दिला. राहुल त्रिपाठी २३ धावांवर त्रिफळाचीत झाला. नितिश राणासह गिल SRHच्या गोलंदाजांचा सामना करत होता, परंतु त्यांच्या धावांचा वेग संथ वाटत होता. गिल ३७ चेंडूंत ५ चौकारांसह ३६ धावा करून माघारी परतला. विजय शंकरनं पुढील षटकात नितिश राणाला ( २९) बाद केले. आंद्रे रसेलकडून पुन्हा अपेक्षा भंग झाला.  दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी अखेरच्या षटकांत दमदार खेळ करताना कोलकाताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. कोलकातानं ५ बाद १६३ धावा केल्या. कार्तिक १४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननं २३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावा केल्या.  

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोसह केन विलियम्सन सलामीला आला. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी धावा पूर्ण करताना संघाला दमदार सुरुवात करून दिली. सातव्या षटकात KKRला ही सेट जोडी तोडण्यात यश आलं. ल्युकी फर्ग्युसननं पहिल्याच चेंडूवर विलियम्सनला बाद केले. विलियम्सन १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावा करून माघारी परतला. डेव्हिड वॉर्नरनं तिसऱ्या क्रमांकावर प्रियम गर्गला पाठवले, परंतु तोही (४) फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. वरुण चक्रवर्थीनं SRHचा सलामीवीर बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टोनं २८ चेंडूंत ७ चौकारांसह ३६ धावा केल्या. फर्ग्युसनच्या यॉर्करनं मनीष पांडेचा ( ६) त्रिफळा उडवला.

ल्युकी फर्ग्युसननं ४ षटकांत १५ धावांत ३ विकेट घेतल्या. गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या फर्ग्युसननं क्षेत्ररक्षणातही कमाल दाखवली. अब्दुल समदनं टोकावलेला चेंडू फर्ग्युसननं षटकार जाऊ न देता सुरेख रितीनं टिपला अन् सीमारेषेच्या आत असलेल्या शुबमन गिलकडे फेकला. समदला २३ धावांवर माघारी जावं लागलं. डेव्हिड वॉर्नरनं मॅच फिनिशरची भूमिका बजावली, पण त्याला विजय मिळवून  देता आला नाही. आंद्रे रसेलनं टाकलेल्या अखेरच्या षटकांत वॉर्नरनं विजयासाठी आवश्यक १८ धावांपैकी १७ धावा करता आल्या. 

सुपर ओव्हरचा थरारलॉकी फर्ग्युसननं पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला बाद केलं.दुसऱ्या चेंडूवर अब्दुल समदनं दोन धावा घेतल्यातिसऱ्या चेंडूवर समदला बाद करून फर्ग्युसननं SRHला २ धावांवर रोखलेकोलकाता नाईट रायडर्सनं ३ धावांचं लक्ष्य सहज पार केले.  

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाद