Join us  

SRH vs KKR Latest News : कार्तिक-मॉर्गनची फटकेबाजी सोडा, ट्विटरवर ट्रेंड होत आहेत अम्पायर; जाणून घ्या कारण

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRला सावध सुरुवात करून दिली, पण...

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 6:29 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRला सावध सुरुवात करून दिली. पण, पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर टी नटराजननं KKRला पहिला धक्का दिला. राहुल त्रिपाठी २३ धावांवर त्रिफळाचीत झाला. नितिश राणासह गिल SRHच्या गोलंदाजांचा सामना करत होता, परंतु त्यांच्या धावांचा वेग संथ वाटत होता. राशिद खाननं गिलला जीवदान दिले, परंतु १२व्या षटकांत राशिदनं त्याला बाद केले. प्रियम गर्गनं ( Priyam Garg) Stunning Running Catch घेतला. गिल ३७ चेंडूंत ५ चौकारांसह ३६ धावा करून माघारी परतला. विजय शंकरनं पुढील षटकात नितिश राणाला ( २९) बाद केले आणि त्याचाही झेल गर्गनं टिपला.

आंद्रे रसेलकडून पुन्हा अपेक्षा भंग झाला. टी नटराजननं फेकलेल्या १५ व्या षटकात रसेल (९) विजय शंकरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी अखेरच्या षटकांत दमदार खेळ करताना कोलकाताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. कोलकातानं ५ बाद १६३ धावा केल्या. कार्तिक-मॉर्गननं पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. कार्तिक १४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननं २३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावा केल्या.  

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोसह केन विलियम्सन सलामीला आला. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी धावा पूर्ण करताना संघाला दमदार सुरुवात करून दिली. सातव्या षटकात KKRला ही सेट जोडी तोडण्यात यश आलं. ल्युकी फर्ग्युसननं पहिल्याच चेंडूवर विलियम्सनला बाद केले. विलियम्सन १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २९ धावा करून माघारी परतला. 

चर्चा तर होणारच...या सामन्यात ४३ वर्षीय पश्चिम पाठक यांच्या हेअरस्टाईलची अधिक चर्चा रंगली. २०१४मध्ये त्यांनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पाठक हे नेहमीच त्यांच्या शैलीनं चर्चीले जातात. २०१५मध्ये ते हेल्मेट घालून मैदानावर पंचगिरी करायला आले होते. असे मैदानावर येणारे ते भारताचे पहिलेच अम्पायर होते. २०१५च्य विजय हजारे ट्रॉफीतील सामन्यात ते हेल्मेट घालून आले होते.    

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाद