Join us  

क्रीडा पत्रकारांना यंदापासून विशेष पुरस्कार देणार, पुरस्कार निवडीमध्ये वशिलेबाजी, राजकारण चालणार नाही

मुंबई : यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्यात क्रीडा पत्रकारांसाठीही विशेष पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:10 AM

Open in App

मुंबई : यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्यात क्रीडा पत्रकारांसाठीही विशेष पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केली.सोमवारी झालेल्या स्पोटर््स जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ मुंबईच्या (एसजॅम) सुवर्णमहोत्सवी वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित तावडे यांनी क्रीडा पुरस्काराची घोषणा केली. तावडे म्हणाले, ‘शिवछत्रपती पुरस्काराद्वारे दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुणवंत खेळाडू, मार्गदर्शन आणि प्रशिक्षक यांचा गौरव होतो. यंदाच्या वर्षामध्ये यामध्ये क्रीडा पत्रकार पुरस्काराचाही समावेश करण्यात येईल.’ त्याचप्रमाणे, ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेत्याची निवड करताना कोणतेही राजकारण किंवा वशिलेबाजी खपवून घेतले जाणार नसून प्रत्येक पुरस्कार हा गुणवत्तेच्या आधारेच घोषित करण्यात येईल, असेही तावडे यांनी या वेळी सांगितले.या क्रीडा पुरस्कार सोहळ्यासाठी मंचावर तावडे यांच्यासह भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर, द्रोणाचार्य पुरस्कारविजेते रघुनंदन गोखले, ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, माजी टेबलटेनिसपटू कमलेश मेहता, अर्जुन पुरस्कारविजेत्या मोनालिसा मेहता आणि माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांची उपस्थिती होती.>पुरस्कारविजेते खेळाडू व संघ :सर्वोत्तम खेळाडू : आकाश चिकटे (हॉकी), विदीत गुजराथी (बुद्धिबळ)सर्वोत्तम महिला खेळाडू : आदिती धुमटकर (जलतरण).सर्वोत्तम ज्यु. खेळाडू : अभिमन्यू पुराणिक (बुद्धिबळ), रायना सलढाणा (जलतरण), दिया चितळे (टेबल टेनिस).सर्वोत्तम खेळाडू (भारतीय खेळ) : प्रशांत मोरे (कॅरम).सर्वोत्तम क्रिकेटपटू : केदार जाधव. (पुणे)सर्वोत्तम रणजी चषक क्रिकेटपटू : अभिषेक नायर (मुंबई).सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू : स्मृती मानधना (सांगली).सर्वोत्तम ज्यु. क्रिकेटपटू : पृथ्वी शॉ (मुंबई).सर्वोत्तम संघ : मुंबई इंडियन्स (क्रिकेट)विशेष सांघिक कामगिरी : मुंबई सिटी एफसी (फुटबॉल).सर्वोत्तम कॉलेज : रिझवी कॉलेज.सर्वोत्तम शाळा : डॉन बॉस्को हायस्कूल, माटुंगा.

टॅग्स :विनोद तावडे