बंदा है बिनधास्त, इसलिए है खास

धोनीमध्ये असे कोणते गुण आहेत, ज्यामुळे तो सर्वांचा लाडका बनला आहे, हे जाणून घेऊ या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 04:30 AM2023-05-31T04:30:45+5:302023-05-31T04:31:18+5:30

whatsapp join usJoin us
sports article on mahendra singh dhoni chennai super kings ipl throphy won 5th time | बंदा है बिनधास्त, इसलिए है खास

बंदा है बिनधास्त, इसलिए है खास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मतीन खान
स्पोर्ट्‌स हेड- सहायक उपाध्यक्ष
लोकमत पत्रसमूह

महेंद्रसिंग धोनीवर जवळपास सर्व भारतीय प्रेम करतात. सोमवारी झालेल्या रोमांचक अंतिम लढतीत सुमारे दीड वाजता रवींद्र जडेजाने मोहित शर्माला लाँग लेगला चौकार मारल्यानंतर माझ्या एका वरिष्ठ सहकाऱ्याचा मेसेज आला की, ‘माझा संघ जिंकला.’ यानंतर मी विचार करू लागलो की, चेन्नई सुपर किंग्जमध्ये अशी काय जादू आहे की प्रत्येक जण या संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत होता. लवकरच कळाले की, हे सीएसकेसाठी नाही, तर हे सर्व प्रेम धोनीसाठी आहे. १४० कोटी भारतीय धोनीचे चाहते आहेत. त्यामुळेच, धोनीमध्ये असे कोणते गुण आहेत, ज्यामुळे तो सर्वांचा लाडका बनला आहे, हे जाणून घेऊ या.

सामना जिंकण्याचे कौशल्य 

धोनी मैदानावर क्वचितंच व्यक्त होतो. चाहरने गिलचा झेल सोडल्यानंतर धोनी खूप रागात होता आणि सामन्यानंतर त्याने जडेजाला ज्या प्रकारे उचलून घेतले ते रोमांचक ठरले. त्याच्यात सामना जिंकण्याचे कौशल्य आहे. पहिल्या क्वालिफायर लढतीत पथिरानासाठी त्याने पंचांना गुंतवून ठेवले. धोनीची खेळाविषयी असलेली समज जबरदस्त आहे. 

निर्मळ मनाची व्यक्ती

अंतिम सामन्यानंतर धोनी खेळाडूंच्या मुलांसोबत खेळताना दिसला. त्याने सँटनर, विजय शंकर यांच्या मुलांना उचलून घेत त्यांच्यासोबत वेळ घालवला. चषक उचलण्याच्यावेळीही त्याने साधेपणाने आनंद व्यक्त केला, जणू काही धोनी साधारण खेळाडू भासला. अशा निर्मळ मनाच्या खेळाडूला हरताना पाहणे कोणाला आवडेल? त्यामुळेच, जोपर्यंत आयपीएल राहिल, धोनीचे नाव असेच चमकत राहील. त्याने कायम आपल्या संघाला सोबतीने पुढे नेले आहे. 

यावर बुल्ले शाह याची  एक शायरी आठवते, 
किसी दर्दमंद के काम आ,
किसी डूबते को उछाल दे, 
यह निगाहें मस्त की मस्ती, 
किसी दर्दमंद पर डाल दे... 
हीच धोनीची स्टाइल आहे.

सन्मान देतो आणि...
अंतिम सामना जिंकल्यानंतर धोनीने गुजरातचा गोलंदाज मोहित शर्माला आलिंगन देत धोनीने त्याचे सांत्वन केले. धोनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा सन्मान करून त्यांचा आदर करतो. यामुळेच प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडूही धोनीचा सन्मान करतात. 

...ठेवतो पूर्ण विश्वास
धोनीकडे साधारण संघ होता. रवींद्र जडेजा, डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड हे नक्कीच स्टार खेळाडू होते; पण चाहर, तुषार देशपांडे आणि पथिरानासारख्या गोलंदाजांना घेऊन त्याने संघाला जेतेपद मिळवून दिले. धोनी आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि त्यांना पूर्ण संधी देतो. त्याने खेळाडूंना चुका केल्यानंतर त्या चुका सुधारण्याची संधीही दिली. त्याच्यामुळेच अजिंक्य रहाणेला नवा आत्मविश्वास मिळाला. 

Web Title: sports article on mahendra singh dhoni chennai super kings ipl throphy won 5th time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.