Join us  

टी२० विश्वचषकाच्या तयारीला आजपासून सुरुवात, न्यूझीलंडविरुद्ध आज पहिला सामना

आत्मविश्वासाने सज्ज भारतीय संघ दुखपताींनी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:56 PM

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड: टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात आत्मविश्वासाने सज्ज असलेला भारत  न्यूझीलंडविरुद्ध प्रथमच  दोन हात करणार आहे.य जमान संघ जखमी खेळाडूंमुळे त्रस्त आहे.

ऑस्ट्रेलियात व डे मालिका आटोपल्यानंतर पाच दिवसांत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी दाखल झाला हे विशेष. याच वर्षाी ऑक्टोबरमध्ये होणाºया टी-२० विश्वचषकाआधी सर्वोत्कृष्ट संयोजनाचा वेध घ्याचा असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन निवडीत सातत्य आणण्याच्या प्रयत्नात आहे. शिखर धवन, हार्दिक पांड्या, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार हे जखमी असले तरी राखीव खेळाडूंनी स्त:ची उपयुक्तता सिद्ध केल्यामुळे दिग्गजांची उणिव जाणवली नाही. धवनचा पर्याय म्हणून लोकेश् राहुल याने विंडीजविरुद्ध शनदार कामगिरी केली. धवन परतला तेव्हा राहुलसोबत चांगली सलामी जोडी बनल्याने रोहितला विश्रांती देण्यात आली. यावेळी धवनच्या अनुपस्थितीत लोकेश आणि रोहित हे डावाची सुरुवात करणार आहेत. लोकेश राहुल हा यष्टिरक्षणातही मोठी भूमिका बजावू शकतो, कर्णधार कोहली याने तसे संकेत दिले आहेत. लोकेशला यष्टिरक्षणाची संधी दिल्यास ऋषभ पंत स्वत:चे स्थान गमावू शकतो. श्रेयस अय्यर चौथ्या आणि मनीष पांडे पाचव्या स्थानावर फलंदाजी करेल. पांडे, अय्यर आणि पंत यांनी गुरुवारी नेट्सवर सोबत सराव केला. नंतर संजू सॅमनस याने फलंदाजी केली.

भारत पाच गोलंदाजांसह खेळल्यास शिवम दुबे बाहेर बसेल. अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा उपलब्ध आहेत. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव २०१९ च्या वन डे विश्वचषकानंतर सोबतीने खेळले नाहीत. वेगवान मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचे खेळणे निश्चित आहे पण शर्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्यापैकी एकाचीच वर्णी लागू शकते.न्यूझीलंडने भारताला मागच्या वर्षी टी-२० मालिकेत २-१ ने पराभूत केले होते. त्यानंतर लंका दौºयात टी-२० मालिका २-१ ने जिनकली तर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडविली होती.

टी-२० त दमदार कामगिरीनंतरही न्यूझीलंडचे मनोबळ ढासळले आहे. आॅस्ट्रेलियाने नुकताच त्यांचा ०--३ ने पराभव केला. यामुळे कर्णधार केन विलियम्सनच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह लागले आहे. न्यूझीलंडकडे अष्टपैलू खेळाडूंची उणिव नाही पण त्यांना संतललन साधणे कठीण होत आहे.ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री,लोनकी फर्ग्यूसन हे जखमी आहेत.

दोन्ही संघ असेभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर,  नवदीप सैनी, वॉशिग्टंन सुंदर.

न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार) , मार्टिन गुप्तिल,रॉस  टेलर, स्कॉट कजेलेजिन, कॉलिन मुन्रो, कोलिन डे ग्रॅन्डहोमे, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनेर, टिम सीफर्ट , हामिश बेनेट, ईश सोढी, टिम साउदी, ब्लेयर टिकनेर.

सामना: उद्या दुपारी १२.२० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार).

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहली