Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिन तेंडुलकरसाठी विनोद कांबळीने केली एक खास गोष्ट

ल्या काही वर्षांपूर्वी या दोघांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट आल्याचे म्हटले जात होते.  पण सचिनच्या अकादमीमध्ये कांबळीने क्रिकेटचे धडे दिले आणि त्यांच्यामध्ये मैत्री पुन्हा झाल्याचे पाहायला मिळाले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 17:33 IST

Open in App
ठळक मुद्देसचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री जगजाहीर.क्रिकेट विश्वात या दोघांच्या मैत्रीचे दाखले दिले जायचे.पण काही वर्षांपूर्वी त्यांचे भांडण झाले होते.

मुंबई : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री जगजाहीर. क्रिकेट विश्वात या दोघांच्या मैत्रीचे दाखले दिले जायचे. पण काही वर्षांपूर्वी त्यांचे भांडण झाले होते. त्यावेळी सचिन आणि विनोद यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता. पण अखेर या दोघांचे मनोमिलन झाले आणि विनोदने सचिनसाठी एक खास गोष्ट केली आहे.

क्रिकेट जगतामध्ये त्यांना जय-वीरू या नावाने ओळखले जायचे. शालेय क्रिकेटमध्ये त्यांनी रचलेली 664 धावांची भागीदारी अजूनही क्रिकेट चाहत्यांना विसरता आलेली नाही. पण गेल्या काही वर्षांपूर्वी या दोघांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट आल्याचे म्हटले जात होते.  पण सचिनच्या अकादमीमध्ये कांबळीने क्रिकेटचे धडे दिले आणि त्यांच्यामध्ये मैत्री पुन्हा झाल्याचे पाहायला मिळाले.

विनोदने आता आपल्या अंगावर काही टॅटू गोंदवून घेतले आहे. हे टॅटू गोंदवताना विनोदने आपल्या हातावर सचिनचे नावही गोंदवून घेतले आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरविनोद कांबळी