Join us  

दक्षिण आफ्रिकेच्या फंलदाजाचा झंझावात, तोडला 96 वर्षे जुना विक्रम

दक्षिण आफ्रिकेच्या 24 वर्षीय खेळाडूनं झंझावाती फंलदाजी करताना 96 वर्षे जुना रेकॉर्ड तोडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 1:00 PM

Open in App

केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेच्या 24 वर्षीय खेळाडूनं झंझावाती फंलदाजी करताना 96 वर्षे जुना रेकॉर्ड तोडला आहे. काल झालेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यात मार्को मारेएसनं 191 चेंडूत 300 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे क्रिकेटविश्वाचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे.   काल झालेल्या बॉर्डर आणि ईस्टर्न प्रॉविंस यांच्यातील सामन्यात बॉर्डरकडून फलंदाजी करताना मार्को मारेएसनं 13 षटकार आणि 35 चौकारांच्या मदतीनं त्रिशतक साजरं केलं आहे. 

मार्को मारेएसपूर्वी स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स मॅकर्टने (221 चेंडू)च्या नावावर होता. पहिल्यांदाच 200 पेक्षा कमी चेंडूमध्ये 300 धावा करण्याचा विक्रम मार्को मारेएसनं केला आहे. मॅकर्टनेशिवाय फ्रँक वूले ने 230 चेंडूत, कॅन रदरफोर्डने 234 चेंडू आणि विवियन रिचर्ड्स, कुसल परेराने 244 चेंडूत 300 धावा केल्या होत्या. 

आणखी वाचा: 'कोहलीचे विराट रुप', नागपूर कसोटीत विक्रमांचा पाऊस

ईस्टर्न प्रॉविंसनं एकवेळ संघाची अवस्था चार बाद 84 अशी केली होती. पण सहाव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मार्को मारेएसनं झंझावाती फंलदाजी करत संघाला अडचणीतून तर काढलेच शिवाय वैयक्तिक विक्रमालाही गवसणी घातली. मार्को मारेएसनं झटपट फंलंदाजी करताना 68 चेंडूत शतक ठोकलं, त्यानंतर 2139 व्या चेंडूला द्विशतक साजरे केलं तर 191 व्या चेंडूला त्रिशतक साजरं करत नवा विक्रम केला. मार्को मारेएसनं 13 षटकार आणि 35 चौकारासह त्रशतक साजरे केल्यानंतर बॉर्डर संघाचा डावा घोषित कऱण्यात आला. मार्को मारेएसनं विलियमस सोबत पाचव्या विकेटसाठी 428 धावांची भागिदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. 

जलद त्रिशतकानंतर माध्यामांशी बोलताना मार्को मारेएस म्हणाला की, कोणत्याही खेळाडूला हे माहित नसतं की तो त्रिशतक लगावेल की नाही. या खेळीनंतर मला खूप आनंदी आहे. चेंडू माझ्या बॅटवर चांगल्याप्रकारे येत होता, त्यामुळे मी फटकेबाजी करु शकलो. 

टॅग्स :क्रिकेटद. आफ्रिका