Join us  

दक्षिण आफ्रिकेच्या 'या' खेळाडूने रचला विक्रम, एका डावात कुटल्या 490 धावा

दक्षिण आफ्रिकेच्या एका 20 वर्षीय खेळाडूने एकदिवसीय सामन्यात शानदार धावांची खेळी करत विक्रम रचला आहे. शेन डॅड्सवेल असे या खेळाडूचे नाव असून त्याने अवघ्या 151 चेंडूत 490 धावा कुटल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 11:41 PM

Open in App
ठळक मुद्देएकदिवसीय सामन्यात शानदार धावांची खेळी करत रचला विक्रम अवघ्या 151 चेंडूत 490 धावा कुटल्याएकूण 27 चौकार आणि 57 षटकार

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या एका 20 वर्षीय खेळाडूने एकदिवसीय सामन्यात शानदार धावांची खेळी करत विक्रम रचला आहे. शेन डॅड्सवेल असे या खेळाडूचे नाव असून त्याने अवघ्या 151 चेंडूत 490 धावा कुटल्या आहेत. या खेळीत त्याने एकूण 27 चौकार आणि 57 षटकार लगावले आहेत.दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये खेळताना शेन डॅड्सवेलने  शनिवारी हा विक्रम रचला. विशेष म्हणजे त्याचा 20 वा वाढदिवस सुद्धा शनिवारी होता. त्यामुळे या सामन्यात त्याने शानदार खेळी करत आपला 20 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. शेन डॅड्सवेलच्या या खेळीच्या जोरावर त्याचा संघ एनडब्ल्यू पुकेने पॉच डॉर्पविरुद्ध 50 षटकांमध्ये 3 बाद 677 धावा केल्या. 

याचबरोबर, या सामन्यात शेन डॅड्समनचा सहकारी लॉरेन स्टीनकॅपने सुद्धा धडाकेबाज खेळी केली. लॉरेन स्टीनकॅपने  52 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा करत शतकी खेळी केली. दरम्यान, विजयासाठी 678 धावांचे आव्हान स्वीकारुन मैदानात उतरलेल्या पॉच डॉर्प संघाला 9 बाद 290 एवढीच मजल मारता आली.

टॅग्स :क्रिकेट