Join us

दक्षिण आफ्रिकेला तंगवून झिम्बाब्वे पराभूत

By admin | Updated: February 15, 2015 00:00 IST

Open in App

३३९ धावांचे लक्ष्य गाठताना झिम्बाब्वेचा डाव ४८.२ षटकांत २७७ धावांवर आटोपला. या सामन्यात आफ्रिकेला ६२ धावांनी विजय मिळाला.

मसकात्झा आणि चिभाबा तंबूत परतल्यावर ब्रेंडन टेलरच्या ४० धावा व सोलोमन मिरेच्या २७ धावांच्या खेळीने आफ्रिकेला सहज विजय मिळवू दिला नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या ३३९ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलेच तंगवले. सलामीवीर चामू चिभाबाच्या ६० धावा आणि तिस-या स्थानावर आलेल्या हॅमिल्टन मसकात्झाच्या ८० धावांच्या खेळीने झिम्बाब्वेला चांगली सुरुवात करुन दिली.

डेव्हिड मिलर आणि जेपी ड्यूमिनी या जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई करत तडाखेबाज शतकही झळकावले. या जोडीने नाबाद २५४ धावांची भागीदारी करत आफ्रिकेला ३३९ धावांचा पल्ला गाठून दिला. मिलरने नाबाद १३८ आणि ड्यूमिनीने नाबाद ११५ धावा केल्या.

वर्ल्डकपमध्ये रविवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात हॅमिल्टनमध्ये सामना पार पडला. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आफ्रिकेची अवस्था ४ बाद ८३ अशी केली.