Join us  

...त्यामुळे आफ्रिदी निराश, पाकिस्तानचे खेळाडू या ग्लॅमरपासून दूर

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली स्थानिक टी-२० लीग पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) सुरुवात केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 2:07 AM

Open in App

आयपीएलच्या नव्या पर्वाने आता जोर धरला आहे. जगातील क्रिकेट चाहते व जाणकारांच्या नजरा आता या स्पर्धेवर केंद्रित झाल्या आहेत. जगातील सर्वांत मोठी व सर्वांत प्रभावी या टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू सहभागी होण्यास इच्छुक असतो. जगातील दिग्गज खेळाडू या लीगमध्ये आपली छाप सोडतात, पण पाकिस्तानचे खेळाडू या ग्लॅमरपासून दूर आहेत. याबाबत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘ही मोठी संधी आहे आणि पाकिस्तानचे युवा खेळाडू यापासून वंचित आहेत.’

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली स्थानिक टी-२० लीग पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे खेळाडू पीएसएलसह जगातील अन्य लीग स्पर्धांमध्ये खेळतात, पण यापैकी कुठल्याही लीगला आयपीएलचे ग्लॅमर नाही. त्यामुळे माजी आक्रमक फलंदाज आफ्रिदीच्या मते, आयपीएल मोठा ब्रँड आहे. तेथे मोठी संधी असते.पहिल्या पर्वात होते पाकचे ११ खेळाडू२००८सालीशोएब मलिकदिल्ली डेअरडेव्हिल्स,मोहम्मद आसिफदिल्ली डेअरडेव्हिल्स,सोहेल तन्वीरराजस्थान रॉयल्सयुनिस खानराजस्थान रॉयल्स, मिसबाह-उल-हकरॉयल चॅलेंजर्स,कामरान अकमलराजस्थान रॉयल्सआफ्रिदीडेक्कन चार्जर्स,मोहम्मद हफीजकोलकाता नाईट रायडर्स उमर गुलकोलकाता नाईट रायडर्ससलमान बटकोलकाता नाईट रायडर्स, शोएब अख्तरकोलकाता नाईट रायडर्सहे सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त अझहर मेहमूद हा ब्रिटिश पासपोर्टवर या स्पर्धेत सहभागी झाला होता.

टॅग्स :शाहिद अफ्रिदीआयपीएल