Join us  

बीसीसीआयच्या मदतीसाठी धावला शेजारी राष्ट्र; IPL 2021च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी दाखवली तयारी

आयपीएलचे उर्वरित 31 सामने कधी व केव्हा खेळवायचे यासाठी बीसीसीआय सप्टेंबर विंडोचा विचार करत आहे. पण, ही स्पर्धा भारतातच होईल का, याबाबत बीसीसीआय आताच कोणती घाई करू इच्छित नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 5:35 PM

Open in App

कोरोना व्हायरसनं बायो बबल भेदल्यानंतर बीसीसीआयनं आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत, परदेशी खेळाडूही परतीच्या प्रवासाला लागले आहेत. आयपीएलचे उर्वरित 31 सामने कधी व केव्हा खेळवायचे यासाठी बीसीसीआय सप्टेंबर विंडोचा विचार करत आहे. पण, ही स्पर्धा भारतातच होईल का, याबाबत बीसीसीआय आताच कोणती घाई करू इच्छित नाही. अशात बीसीसीआयसमोर यूएई हा सुरक्षित पर्याय आहे. इंग्लंड कौंटी क्लब्सनीही आयपीएल सामन्यांच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. आता श्रीलंका क्रिकेटनेही बीसीसीआयच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. 2020तही श्रीलंकेनं आयपीएल आयोजनाची तयारी दर्शवली होती. महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघानं मोडला मोठा नियम; ते दोन खेळाडू ठरू शकतात कोरोनाचे सुपर स्प्रेडर?

डेक्कन क्रोनिकल सोबत बोलताना श्रीलंका क्रिकेटच्या व्यवस्थापकिय मंडळाचे प्रमुख प्रो. अर्जुन डी सिल्व्हा यांनी सांगितले की,लंका प्रीमिअर लीगसाठी आम्ही ग्राऊंड्स व अन्य सुविधा तयार केल्या आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये लंका प्रीमिअर लीगचे आयोजन केले जाईल. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आयपीएलच्या आयोजनासाठी आम्ही तयार आहोत. यूएईचा पर्यायही बीसीसीआयसमोर आहे, परंतु श्रीलंकेला कोणत्याच कारणामुळे दुर्लक्षित करता कामा नये.'' IPL 2021मधून मिळालेला संपूर्ण पगार कोरोना लढ्यासाठी केला दान; KKRच्या माजी खेळाडूचं मोठं काम

आयपीएल 2021त एकाही श्रीलंकनं खेळाडूचा समावेश नव्हात. पण, मुथय्या मुरलीधरन ( सनरायझर्स हैदराबाद), माहेला जयवर्धने ( मुंबई इंडियन्स) आणि कुमार संगकारा ( राजस्थान रॉयल्स) हे फ्रँचायझींच्या कोचिंग स्टाफचे सदस्य होते.  श्रीलंका क्रिकेटनं अद्याप याबाबतचं अधिकृत पत्र बीसीसीआयला पाठवलेले नाही.  IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव!

IPL 2021 इंग्लंडमध्ये खेळवणे बेकायदेशीर ठरेल; BCCIला धक्का 

इंग्लंड कौंटी क्लब्सनी लंडनमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण, इंग्लंडमध्ये आयपीएल खेळवणे बेकायदेशीर ठरेल, असे वृत्त समोर आले आहे. हॅम्पशायक कौंटीच्या प्रमुखांनी सांगितले की,''मी पण ही चर्चा ऐकली, परंतु इथे आयपीएल कशी होईल, याबाबत मीही खात्री देऊ शकत नाही. पण, सद्याच्या नियमानुसार इथे आयपीएलचे आयोजन होणे, बेकारदेशीर ठरेल.''  ESPN Cricinfo च्या माहितीनुसार MCC, Surrey, Warwickshire आणि  Lancashire या कौंटी क्लब्सनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पत्र पाठवून सप्टेंबरच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाची विचारपूस केली. पण, याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड व MCCयांच्याकडून दुजोरा मिळाला नाही.  

 

 

टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआयश्रीलंका