SL W vs BAN W 4 Wickets In 4 Balls But Chamari Athapathth Miss Hat trick : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नवी मुंबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात अखेरच्या षटकात कमालीचे ट्विस्ट पाहायला मिळाले. ५ विकेट्स हातात असताना बांगलादेशच्या संघाला ६ चेंडूत फक्त ८ धावा करायच्या होत्या. हा सामना श्रीलंकेचा संघ जिंकेल, अशी कल्पनाही कुणी केली नसेल. पण म्हणतात ना, क्रिकेटमध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही. अगदी असंच काहीसं घडलं अन् शेवटच्या षटकात कमालीच्या ट्विस्टसह श्रीलंकेनं हातून निसटलेला सामना जिंकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
४ चेंडूत ४ विकेट्स, तरीही श्रीलकनं कॅप्टनच्या नावे झाली नाही हॅटट्रिक
श्रीलंकन कर्णधार अटापट्टू घेऊन आलेल्या अखेरच्या षटकात बांगलादेशच्या संघाने ४ चेंडूत ४ विकेट्स गमावल्या. या सामन्यातील पराभवासह स्पर्धेतून आउट होणारा पहिला संघ ठरण्याची वेळ त्यांच्यावर आली.. पण अटापट्टूला मात्र हॅटट्रिकचा डाव हुकला. आता चार चेंडूत चार विकेट्स मिळाल्या, मग हॅटट्रिक का नाही असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. इथं जाणून घेऊयात सविस्तर
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून ...
नियमानुसार ४ वैध चेंडूवर सलग ४ विकेट्स, पण तरीही गोलंदाजाच्या नावे झाल नाही हॅटट्रिक, कारण...
क्रिकेटच्या मैदानात कोणत्याही प्रकारात गोलंदाज ज्यावेळी सलग तीन चेंडूत तीन विकेट घेतो त्यावेळी त्याच्या नावे हॅटट्रिकची नोंद होते. जर गोलंदाजाने वाइड किंवा नो बॉल फेकला तर हॅटट्रिक मानली जात नाही. अटापट्टूच्या षटकात चारही चेंडू वैध होते. पण नेमकी दुसऱ्या चेंडूवर जी विकेट मिळाली ती रनआउटच्या रुपात मिळाली. त्यामुळे पहिल्या चेंडूवर मिळालेली विकेट आणि सलग चौथ्या चेंडूवर मिळालेली विकेट यात खंड पडला. दुसऱ्या चेंडूएवजी जर पहिल्या किंवा अखेरच्या चेंडूवर ही रनआउटची विकेट मिळाली असती तर अटापट्टूच्या नावे हॅटट्रिक नोंदवली गेली असती. पण तसे झाले नाही.
हॅटट्रिक हुकली, पण वनडेत पहिल्यांदा केली अशी कामगिरी
श्रीलंकन कर्णधार चामरी अटापट्टू हिने अखेरच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी करत सामना फिरवला. या षटकात रनआउटची विकेट सोडली तर तिने ३ विकेट्स आपल्या नावे जमा केल्या. याआधी तिने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली होती. १० षटकांच्या आपल्या कोट्यात ४२ धावा खर्च करून तिने ४ विकेट्सचा डाव साधला. हॅटट्रिक हुकली असली तरी वनडे कारकिर्दीत तिने पहिल्यांदाच गोलंदाजीत 'चौकार' मारत खास डाव साधल्याचे पाहायला मिळाले.