Join us  

'फक्त दोन ओळींनी डोकं गरगरलं, पूर्ण पुस्तक वाचलं तर...'; इरफान पठाणने पुन्हा MS Dhoniला डिवचलं?

चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) Indian Premier League ( IPL 2020 ...

By स्वदेश घाणेकर | Published: October 06, 2020 4:11 PM

Open in App

चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) Indian Premier League ( IPL 2020) च्या या पर्वात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. इतकी वर्ष क्रिकेटची मैदानं गाजवल्यानंतर धोनीला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये फटकेबाजी करताना संघर्ष करावा लागत आहे. UAEत तो चाचपडताना दिसत आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या वयाची चर्चा रंगली होती. त्यात माजी गोलंदाज इरफान पठाण यानं लिहिलेल्या पोस्टचा संदर्भ धोनीच्या वयाशी लावण्यात आला.  

रोहित शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोठा विक्रम मोडणार; सुरेश रैनाला मागे सोडणार

165 धावांचा पाठलाग करताना धोनी 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, CSKनं 7 धावांनी हा सामना गमावला. या सामन्यात धोनीनं 36 चेंडूंत 47 धावा केल्या आणि तो धाप टाकताना पाहायला मिळाला. UAEच्या वातावरणात तो प्रचंड दमलेला दिसला. या सामन्यानंतर इरफाननं ट्विट केलं की,''काही लोकांसाठी वय हे केवळ नंबर आहे आणि काहींसाठी संघातून हकालपट्की करण्याचं कारण.''  इरफानच्या या ट्विटचा संदर्भ धोनीच्या संथ खेळीशी लावण्यात आला. हरभजन सिंगनेही इरफानच्या ट्विटवर कमेंट करताना लिहिलं की,''10000000 टक्के तुझ्याशी सहमत.'' आता इरफाननं पुन्हा एक ट्विट केलं. त्यात त्यानं लिहिलं की,''फक्त दोन ओळींनी डोकं गरगरलं, संपूर्ण पुस्तक वाचलं तर चक्कर पण येईल.'' इरफानच्या या ट्विटचा संदर्भ धोनीच्या खराब कामगिरीशी जोडला जात आहे.   इरफान 2012मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा खेळला होता आणि त्यानंतर त्याला संघातून कॉल आलाच नाही. या काळात तो स्थानिक क्रिकेट आणि Indian Premier League मध्ये खेळत होता.  इरफाननं ( Irfan Pathan) जानेवारी 2020मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

टॅग्स :IPL 2020इरफान पठाणमहेंद्रसिंग धोनी