Join us  

श्रेयस अय्यरच्या नशिबी आणखी प्रतीक्षाच...

मर्यादित षटकांच्या सामन्यातील भारताचा गुणी खेळाडू श्रेयस अय्यर हा खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 8:57 AM

Open in App

लंडन : मर्यादित षटकांच्या सामन्यातील भारताचा गुणी खेळाडू श्रेयस अय्यर हा खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. रॉयल लंडन चषकात लॅंकेशायरकडून त्याला खेळायचे होते. मात्र, जखमेतून पूर्णपणे बरा न झाल्याने तो खेळू शकणार नाही. 

यावर्षी पुण्यात इंग्लंडविरूद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्याच्यावेळी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली.  ब्रिटनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अलीकडे त्याने नेटमध्ये सरावही केला. पण २२ जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित स्पर्धेसाठी आवश्यक फिटनेस श्रेयस सिद्ध करू शकलेला नाही. लॅंकेशायर कौंटीने दिलेल्या माहितीनुसार,  क्लब, बीसीसीआय आणि खेळाडू यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अय्यर या स्पर्धेत खेळू शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

याविषयी बोलताना अय्यर म्हणाला, ‘या सत्रात लॅंकेशायरकडून खेळायला मिळणार नाही, याचा खेद वाटतो. हा ऐतिहासिक क्लब आहे. भविष्यात मात्र या क्लबकडून अमिरात ओल्ड ट्रॅफोर्ड चषक खेळण्याची अपेक्षा बाळगतो.’ 

टॅग्स :लंडन