Join us

विराट कोहलीच्या वेळापत्रकावर बोर्डाने विचार करावा : खन्ना

नागपूर : ‘भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या खूप व्यस्त असल्याने त्याच्या वेळापत्रकाबाबत बोर्डाला गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 03:38 IST

Open in App

नागपूर : ‘भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या खूप व्यस्त असल्याने त्याच्या वेळापत्रकाबाबत बोर्डाला गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. यामुळे पुढील महिन्यात होणा-या दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी सज्ज राहण्यासाठी त्याला अधिक वेळ मिळेल,’ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी म्हटले. त्याचबरोबर, इतक्या कमी वेळेमध्ये सलग ३ मालिका ठेवण्याबाबतही बोर्ड सदस्यांनी विचार करणे जरुरी असल्याचे मतही खन्ना यांनी व्यक्त केले.खन्ना यांनी सांगितले की, ‘विराट कर्णधार असून त्याच्या क्रिकेटसंबंधी मतांचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. आम्हाला संघाच्या कामगिरीवर गर्व आहे. परंतु, जर खेळाडू थकल्यासारखे अनुभव घेत असतील, तर त्याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे.’ त्याचबरोबर खन्ना यांनी घरच्या मैदानावर आयोजित करण्यात येणाºया मालिकांबाबतही विचार करण्याचे जरुरी असल्याचे मान्य केले.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट