Join us  

धक्कादायक! प्रशिक्षकांना शिविगाळ केल्यामुळे भारताचा 'हा' खेळाडू झाला संघातून आऊट

प्रशिक्षकांना शिवीगाळ करणे अयोग्य असल्याचे मत या घटनेनंतर चाहत्यांकडून व्यक्त केले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 4:11 PM

Open in App

मुंबई : प्रशिक्षकांनाच शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. एका गोष्टीवरून थोड वाद झाल्यावर खेळाडूने मैदानात चक्क प्रशिक्षकांनाच शिवी हासडल्याचे पाहायला मिळाले आहे.

खेळाडूंमधल्या कमतरतेवर प्रशिक्षक काम करत असतात. खेळाडूंचे तंत्र, शारीरिक आणि मानसीत स्वास्थ सांभाळण्याचे कामही प्रशिक्षक करत असतात. एखाद्या खेळाडूकडून चांगली कामगिरी होत नसेल तर प्रशिक्षक त्याला समाजवण्याचे काम करतो. त्यामुळे प्रशिक्षकांना शिवीगाळ करणे अयोग्य असल्याचे मत या घटनेनंतर चाहत्यांकडून व्यक्त केले जात आहे.

खेळपट्टी कशी असायला हवी, यावरून भारताच्या या खेळाडूबरोबर प्रशिक्षकांचा वाद झाला. प्रशिक्षकांना खेळपट्टीवर हिरवळ हवी होती. पण दुसरीकडे भारताच्या या खेळाडूला खेळपट्टीवर हिरवळ नको होती. या विषयांवरून खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये वाद सुरु झाला. या वादामध्ये खेळाडूने प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारताच्या या खेळाडूला शिवीगाळ केल्यामुळे संघातून बाहेर करण्यात आले.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारताचे माजी क्रिकेटपटू बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी सांगितले की, " आज सरावामधून मी थोडा लवकर निघालो. त्यामुळे हा प्रकार माझ्यासमोर घडला नाही. मी घरी पोहोचल्यावर मला ही माहिती मिळाली. बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडा आणि सहाय्यक प्रशिक्षक राणादेव बोस यांच्यामध्ये वाद झाला. या वादामध्ये दिंडाने बोस यांना शिवीगाळ केली. ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. य गोष्टीची मी निंदा करतो. त्यामुळे दिंडाला आम्ही रणजी सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे." 

 

टॅग्स :रणजी करंडक