Join us  

धक्कादायक! सामन्यापूर्वी बाऊंड्री लाइन चोरीला गेली...

जेव्हा बाऊंड्री लाइन चोरीला गेल्याची गोष्ट समजली तेव्हा काही वेळातच सामना खेळवला जाणार होता. पण आता सामना कसा खेळवायचा, हा प्रश्न साऱ्यांना पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 8:10 PM

Open in App

नवी दिल्ली : सामना सुरु पूर्वी एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. सामना सुरु होण्यापूर्वी मैदानातील बाऊंड्री लाइन चोरीला गेल्याची अजब घटना पाहायला मिळाली. ही घटना रात्री घडल्याचे समजते. कारण जेव्हा सकाळी ग्राऊंडमन मैदानात आले तेव्हा त्यांना बाऊंड्री लाइन चोरीला गेल्याचे समजले.

बाऊंड्री लाइन रस्सी ३०० मीटर लांबीची असते. मैदानाच्या एकाबाजूला भरपूर झाडे होती. त्यामुळे चोरांनी त्या मार्गाने ही रस्सी लांबवल्याचे समजते. जेव्हा बाऊंड्री लाइन चोरीला गेल्याची गोष्ट समजली तेव्हा काही वेळातच सामना खेळवला जाणार होता. पण आता सामना कसा खेळवायचा, हा प्रश्न साऱ्यांना पडला. 

या मैदानात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. त्यामुळे ही चोरी कशी घडली ते समजू शकले आहे. मैदानाच्या एका बाजूला असणाऱ्या भरपूर झाडांमधून चोर मैदानात घुसले. त्यांनी लांबलचक असलेली रस्सी एकत्रित केली आणि त्यांनी तिथून पळ काढल्याचे पाहायला मिळाले. 

चोरीला गेलेल्या रस्सीची किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल. कारण ही रस्सी जवळपास ६१ हजार रुपयांची होती. त्यामुळे आता रस्सी चोरीला गेल्यावर नेमके करायचे काय हा प्रश्न आयोजकांना पडला. पण त्यांनीही यावेळी एक शक्कल लढवली. आयोजकांनी बाऊंड्री लाइनला झेंडे लावले आणि सामना सुरु केला.

ही घटना घडली ती क्रिकेटला जन्म देणाऱ्या इंग्लंडमध्ये. नॉर्थ लिंकनशायर क्रिकेट क्लब हा इंग्लंडमध्ये आहे. या क्लबमध्ये ही घडना घडली आहे. 

टॅग्स :इंग्लंड