T20 World Cup Shimron Hetmyer : विमान चुकलं अन् विंडीजने खेळाडूला वर्ल्ड कप संघातून बाहेर काढलं

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 08:39 AM2022-10-04T08:39:09+5:302022-10-04T08:41:16+5:30

whatsapp join usJoin us
shimron hetmyer dropped from west indies squad for the t20 world cup after missing his rescheduled flight to australia | T20 World Cup Shimron Hetmyer : विमान चुकलं अन् विंडीजने खेळाडूला वर्ल्ड कप संघातून बाहेर काढलं

T20 World Cup Shimron Hetmyer : विमान चुकलं अन् विंडीजने खेळाडूला वर्ल्ड कप संघातून बाहेर काढलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Shimron Hetmyer : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत अनेक खेळाडू दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असून विश्वचषकाचा भाग होण्यासाठी मेहनत घेत आहेत. तर काही खेळाडू विश्वचषकापूर्वीच दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र, वेस्ट इंडिज क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

खरं तर, वेस्ट इंडिजच्या संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्याला दुखापत झाली नाही, पण फ्लाइट मिस झाल्यामुळे बोर्डाने कठोर निर्णय घेत त्याला टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात शिमरॉन हेटमायरच्या जागी फलंदाज शमर ब्रूक्सला स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली. 


"सीडब्ल्यूआय निवड समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. हेटमायरनं ऑस्ट्रेलियासाठी आपलं रिशेड्युल केलेलं विमान चुकवलं. काही कारणास्तव त्यानं वेळ बदलली होती," असं क्रिकेट बोर्डानं म्हटलं. दरम्यान क्रिकेट बोर्डानं सर्वांच्या संमतीनं टी२० विश्वचषक स्पर्धेत हेटमायरच्या जागी शमरह ब्रुक्र याची निवड करण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

Web Title: shimron hetmyer dropped from west indies squad for the t20 world cup after missing his rescheduled flight to australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.