रिषभने प्रचंड संयम, सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल, शिखर धवनला विश्वास

IPL 2024: आयपीएल आपल्या सतराव्या हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 08:07 PM2024-03-12T20:07:40+5:302024-03-12T20:09:46+5:30

whatsapp join usJoin us
shikhar dhawan said, delhi capital's player rishab pant has shown a lot of patience he wonders for the country, read here details  | रिषभने प्रचंड संयम, सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल, शिखर धवनला विश्वास

रिषभने प्रचंड संयम, सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल, शिखर धवनला विश्वास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल आपल्या सतराव्या हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे दहा दिवस उरले असून मंगळवारी बीसीसीआयने एक मोठी खुशखबर दिली. भारतीय संघाचा यष्टीरक्षक खेळाडू दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत पुनरागमनासाठी सज्ज आहे. डिंसेबर २०२२ मध्ये पंतचा भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. आपला सहकारी खेळाडू पंतचे पुनरागमन होत असल्याचे पाहून पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने आनंद व्यक्त केला आणि त्याच्या संयमाचे तोंडभरून कौतुक केले. 

धवन म्हणाला की, रिषभ पंतचा प्रवास खूप हृदयद्रावक आहे. भीषण अपघात आणि एवढ्या कठीण परिस्थितीतून स्वत:ला धीर देत त्याने पुनरागमनपर्यंतचा प्रवास केला आहे. तो आगामी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे, ही युवा खेळाडूंसाठी एक प्रेरणा असेल. पंतसोबत माझे कौटुंबिक संबंध आहेत. गब्बर धवन 'स्टार स्पोर्ट्स'वरील एका कार्यक्रमात बोलत होता. 

तसेच रिषभ पंतला पुन्हा ॲक्शनमध्ये पाहण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. अशा जीवघेण्या अपघातातून तो वाचला, देवाचे आभार मानावे तितके कमीच आहेत. गेल्या वर्षभरात त्याने खूप मेहनत घेतली आणि असा सकारात्मक हेतू दाखवला ज्यामुळे तो पुनरागमनासाठी सज्ज झाला. त्याला इतक्या वेदना होत होत्या की सुरुवातीचे काही महिने त्याला हालचालही करता येत नव्हती. त्या खडतर टप्प्यापासून ते आत्तापर्यंत त्याने खूप संयम, सकारात्मकता आणि सहनशीलता दाखवली आहे आणि ही खूप मोठी बाब आहे. यामुळे त्याला नक्कीच खूप बळ मिळाले असून मला खात्री आहे की तो स्वत:साठी आणि देशासाठी नक्कीच चमत्कार करेल, असा विश्वास शिखर धवनने व्यक्त केला.

IPL चे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक 

  1. २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  2. २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  3. २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  4. २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  5. २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  6. २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  7. २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  8. २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  9. २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  10. २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  11. ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  12. ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  13. ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  14. १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  15. २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  16. ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  17. ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  18. ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  19. ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  20. ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ

Web Title: shikhar dhawan said, delhi capital's player rishab pant has shown a lot of patience he wonders for the country, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.