Join us  

India tour of Sri Lanka : शिखर धवन करणार टीम इंडियाचे नेतृत्व?; २० जणांची ही दुसरी फळी 'विराट'सेनेलाही देऊ शकते टक्कर!

India’s predicted limited-overs squad for Sri Lanka tour श्रेयस अय्यर तोपर्यंत तंदुरुस्त न झाल्यास शिखर धवन किंवा हार्दिक पांड्या यापैकी एक जण टीम इंडियाचे नेतृत्व करेल, अशी माहिती PTIनं दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 5:42 PM

Open in App

तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. याच कालावधीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. जुलै महिन्यात तेथे भारतीय संघाला सुट्टी असली तरी कोरोना नियमांमुळे त्यांना मायदेशात येऊन पुन्हा इंग्लंड दौऱ्यासाठी जाणे शक्य नाही. त्यामुळे बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यासाठी टीम बी पाठवण्याची तयारी केली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड न झालेल्या व दुसऱ्या फळीतील खेळाडूंची निवड या दौऱ्यासाठी केली जाईल. या दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडू शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी माहिती IANS नं दिली आहे. ( According to IANS, Shikhar Dhawan likely to lead the Indian team for the Sri Lankan tour)

जागतिक कसोटी अजिंक्यपद व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेला संघभारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव; लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला. 

कसा असेल श्रीलंका दौरा?वन डे मालिका - १३ जुलै, १६ जुलै व १९ जुलैट्वेंटी-२० मालिका - २२ जुलै, २४ जुलै व २७ जुलैसर्व सामने कोलंबो येथे खेळवण्यात येतील.

संभाव्य संघ ( India’s predicted limited-overs squad for Sri Lanka tour) शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन, शेल्डन जॅक्सन, हार्दिक पांड्या, जलाज सक्सेना, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, दीपक चहर, राहुल चहर, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्थी, नवदीप सैनी 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाशिखर धवनबीसीसीआय