Join us  

शिखर धवनने केली HIV Test, मनाली ट्रिपनंतर घाबरला गब्बर; स्वतः केला खुलासा...

एका मुलाखतीत शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 5:56 PM

Open in App

ShiKhar Dhawan : भारताचा स्टार फलंदाज शिखर धवने HIV चाचणी केल्याची माहिती समोर आली आहे. या गोष्टीचा खुलासा स्वतः शिखरने केला आहे. मनालीहून परतल्यानंतर शिखर इतका घाबरला होता की, त्याला एचआयव्ही चाचणी करावी लागली. ही चाचणी घेण्यामागचे कारणही त्यांने सांगितले आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना गब्बरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टींचा खुलासा केला. 

शिखर धवनला अंगावरील टॅटूची खूप आवड आहे. एकदा त्याने चुकून इतराने वापरलेल्या सुईने टॅटू बनवला. यानंतर तो इतका घाबरला की, स्वतःची HIV चाचणी करुन घेतली होती. हा टॅटू त्याने वयाच्या 15 व्या वर्षी मनालीच्या सहलीदरम्यान काढला होता. त्याने आपल्या पाठिवर स्कॉर्पिओचा टॅटू काढला होता. या टॅटूबाबत त्याने घरच्यांनाही काही माहिती दिली नव्हती. 

3-4 महिने त्याने हा टॅटू घरच्यांपासून लपवून ठेवला, मात्र वडिलांना समजल्यानंतर त्याला वडिलांनी चांगलाच चोप दिला. टॅटू बनवल्यानंतर तो खूप घाबरला होता, कारण एकाच सुईने किती जणांनी टॅटू काढला याची त्याला माहिती नव्हती. सुदैवाने धवनची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह आली. दरम्यान, या मुलाखतीत शिखरने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील उलथापालथीबद्दलही भाष्य केले. शिखर त्याची पत्नी आयेशा मुखर्जीपासून वेगळा झाला आहे. घटस्फोटाची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याचे त्यांने सांगितले.

टॅग्स :शिखर धवनऑफ द फिल्ड
Open in App