Join us  

INDvsAFG : ऐतिहासिक कसोटीत गब्बरचा शतकी तडाखा, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

शिखर धवनने शतकी खेळी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 12:19 PM

Open in App

बंगळुरु -  बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर अफगाणिस्तान विरोधात सुरु असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात शिखर धवनने शतकी खेळी केली आहे. शिखर धवनेने 87 चेंडूत 18 चौकार आणि तीन षटकारांसह 100 धावांची धुवांधार खेळी केली. शिखर धवनने आपल्या कसोटी करिअरचे 7 शतक ठरले. लंचपर्यंत भारताने बिनबाद 158 धावा केल्या आहेत. मुरली विजयनेही 41 धावावर खेळत आहे.  भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  

लंचआधी शतक करणारा शिखर धवन पहिला भारतीय ठरला आहे. तर सहावा आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला आहे. 

प्रतिस्पर्धी संघभारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल, करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव.

अफगाणिस्तान : अशगर स्टेनिकजई, मोहम्मद शहजादस जावेद अहमदी, रहमत शाह, एहसानुल्लाह जनात, नासीर जमाल, हशमतुल्ला शाहिदी, अफसर जजाई, मोहम्मद नबी, राशिद खान, जहीर खान, अमीर हमजा होताक, सैयद अहमद शिरजाद, यामिन अहमदजई वफादार, मुजीब उर-रहमान.