Join us  

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादच्या अष्टपैलू खेळाडूनं घेतला 'बायो-बबल' सोडण्याचा निर्णय, मायदेशी रवाना होणार

IPL 2021, Sherfane Rutherford: आयपीएलमध्ये यंदाच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादसमोरील संकटं काही कमी होताना दिसत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 9:15 PM

Open in App

IPL 2021, Sherfane Rutherford: आयपीएलमध्ये यंदाच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादसमोरील संकटं काही कमी होताना दिसत नाहीत. संघाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला कोरोनाची लागण झाल्यामुळे विजय शंकरसह सहा जण क्वारंटाइन असताना आता आणखी एका परदेशी खेळाडूनं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू शेरफेन रदरफोर्ड (Sherfane Rutherford) यानं 'बायो-बबल' मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून तो मायदेशी रवाना झाला आहे. शेरफेन याच्या वडिलांचा निधन झाल्यामुळे तो मायदेशी रवाना झाल्याचं सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. 

'ऋषभ पंतला भारतीय संघातून बाहेर काढायचं असेल तर...', रिकी पाँटिंगनं केली मोठी भविष्यवाणी

"शेरफेन रदरफोर्ड याच्या वडिलांचं निधन झालं असून सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ शेरफेन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. शेरफेन यानं आयपीएलच्या बायो-बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून तो मायदेशी रवाना होणार आहे. त्यावर ओढवलेल्या दु:खाच्या काळात कुटुंबीयांसोबत राहण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे", असं ट्विट सनरायझर्स हैदराबादनं केलं आहे. 

लय भारी... १ हजारी मुंबईचा 'कारभारी'! रोहित शर्माचा KKR विरुद्ध अनोखा विक्रम

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्या कमतरता भरून काढण्यासाठी हैदराबादनं शेरफेन याचा संघात समावेश केला होता. पण आता शेरफेन देखील हैदराबादसाठी उपलब्ध नसणार आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबाद
Open in App