Join us  

शास्त्री यांना पुन्हा करावा लागणार अर्ज

मुख्य प्रशिक्षकपदासह सहयोगी स्टाफच्या नेमणुकीसाठी बीसीसीआय लवकरच नव्याने अर्ज मागविणार आहे. यामुळे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही नव्याने अर्ज करावा लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 3:52 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह सहयोगी स्टाफच्या नेमणुकीसाठी बीसीसीआय लवकरच नव्याने अर्ज मागविणार आहे. यामुळे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही नव्याने अर्ज करावा लागेल.पुढील महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाईल. यानंतर ५७ वर्षीय शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा करार संपणार आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचाही करार संपणार आहे. भारतीय संघ ३ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात विंडीज दौºयावर जाईल. यादरम्यान मुख्य प्रशिक्षक तसेच सहयोगी स्टाफ निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नसल्याने शास्त्री व कंपनीचा कार्यकाळ ४५ दिवसांसाठी वाढविण्यात आला.वरील सर्व जण पुन्हा अर्ज करू शकतात. शंकर बासू व पॅट्रिक फरहार्ट यांनी पद सोडल्यामुळे ट्रेनर व फिजिओ या पदांवर नवी नेमणूक होईल. विंडीज दौºयानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर द. आफ्रिकेविरूद्ध खेळेल.याआधी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना पद सोडावे लागल्यानंतर २०१७मध्ये शात्री यांच्याकडे सुत्रे आली. त्यापूर्वी आॅगस्ट २०१४ ते २०१६ या काळात शास्त्री हे भारतीय संघाचे संचालक होते. त्यांच्या कार्यकाळात भारताने आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकली नाही. मात्र, यंदा भारताने त्यांच्या मार्गदर्शनात आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

टॅग्स :रवी शास्त्रीवर्ल्ड कप 2019