नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं?; पंजाब किंग्सचं ट्विट अन् शशांक सिंगचं रिट्विट!

आयपीएलच्या लिलावादरम्यान पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीसोबत असे काही झाले ज्यामुळे एकच हशा पिकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 04:09 PM2023-12-21T16:09:30+5:302023-12-21T16:31:11+5:30

whatsapp join usJoin us
Shashank Singh Ends IPL 2024 Auction Controversy With His Its All Cool Post After Punjab Kings Franchise Explained | नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं?; पंजाब किंग्सचं ट्विट अन् शशांक सिंगचं रिट्विट!

नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं?; पंजाब किंग्सचं ट्विट अन् शशांक सिंगचं रिट्विट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत असून, मंगळवारी यासाठी मिनी लिलाव पार पडला. परदेशी खेळाडूंवर मोठी लागली तर स्टार्क आणि कमिन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ऐतिहासिक कमाई केली. मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा (२४.७५ कोटी) खेळाडू ठरला. स्टार्कला केकेआरच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले. मात्र, या लिलावादरम्यान पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीसोबत असे काही झाले ज्यामुळे एकच हशा पिकला. यानंतर पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीला ट्रोल करण्यात आले. 

खरं तर पंजाबच्या फ्रँचायझीला नको असताना देखील जबरदस्ती एका खेळाडूची खरेदी करावी लागल्याची चर्चा रंगली होती. शशांक सिंग नावाच्या खेळाडूला खरेदी करायचा नव्हता, मात्र एका चूकीमुळे त्याला संघात घ्यावं लागलं, असं सांगण्यात येत होते. सदर घडलेल्या प्रकरणावर आता पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीने ट्विट करत माहिती दिली आहे. शशांक सिंग आमच्या यादीत होता. मात्र एकाच नावाचे २ खेळाडू या यादीत असल्याने गोंधळ झाला. शशांक सिंगला आमच्या संघात घेऊन आम्हाला खूप आनंद झाला. त्याला संघाच्या यशात योगदान देण्यासाठी शुभेच्छा आहेत, असं पंजाब किंग्सने अधिकृत ट्विटरद्वारे सांगितले. त्यानंतर तीच पोस्ट पुन्हा शेअर करताना शशांकने फ्रँचायझीचे आभार मानले आणि सर्व काही ठीक असल्याचे स्पष्ट केले.

नेमकं काय घडलं?

लिलावादरम्यान ऑक्शनर मल्लिका सागरने छत्तीसगडकडून खेळणाऱ्या ३२ वर्षीय शशांक सिंगच्या नावाची घोषणा केली. शशांकसाठी सर्वप्रथम पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीने बोली लावली. लक्षणीय बाब म्हणजे शशांकसाठी बोली लावणारी पंजाबची एकमेव फ्रँचायझी होती. मग त्यांनी त्याला त्याच्या मूळ किंमतीसह (२० लाख) आपल्या संघात घेतले. पण, पंजाबला दुसऱ्याच खेळाडूला खरेदी करायचे होते. चूक लक्षात येताच त्यांनी ऑक्शनरला ही बाब सांगितली देखील पण काहीच फायदा झाला नाही. चुकून आम्ही शशांकला खरेदी केले असल्याचे पंजाबनं सांगितलं. परंतु, नियमानुसार एकदा खरेदी झाल्यानंतर निर्णय बदलला जात नाही. त्यामुळे पंजाबला नको असताना देखील शशांकला खरेदी करावे लागले.

शशांक सिंगचा प्रवास 

लिलावात नाट्यमय घडामोड झाली असली तरी अष्टपैलू शशांक सिंग पंजाब किंग्सच्या जर्सीत दिसणार आहे. तो या आधी सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. हैदराबादने रिलीज केल्यानंतर शशांक लिलावाच्या रिंगणात आला. आयपीएल २०२३ साठी तो अनसोल्ड राहिला होता. शशांकने आतापर्यंत १० आयपीएल सामने खेळले असून ६९ धावा केल्या आहेत. 

आयपीएल २०२४ साठी पंजाबचा संघ -

रिटेन केलेले खेळाडू - शिखर धवन ( कर्णधार ), जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, ऋषी धवन, प्रभसिमरन सिंग, सॅम करन, सिकंदर रझा, हरप्रीत बराड, राहुल चाहर, कगिसो रबाडा, नाथन एलिस, शिवम सिंग, हरप्रीत भाटिया, विदवथ कावेरप्पा. 

लिलावात खरेदी केलेले खेळाडू - हर्षल पटेल ( ११.७५ कोट ), ख्रिस वोक्स ( ४.२ कोटी ), आशुतोष शर्मा ( २० लाख ), विश्वनाथ प्रताप सिंग ( २० लाख ), शशांक सिंग ( २० लाख ),  प्रिंस चौधरी ( २० लाख ), तनय त्यागराजन ( २० लाख ), रिले रौसोव ( ८ कोटी ). 

Web Title: Shashank Singh Ends IPL 2024 Auction Controversy With His Its All Cool Post After Punjab Kings Franchise Explained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.