Shardul Thakur to lead West Zone in Duleep Trophy 2026: इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत असलेल्या शार्दुल ठाकूरला आता कॅप्टन्सीची लॉटरी लागली आहे. बीसीसीआयनं दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभाग संघाची घोषणा केली आहे. २८ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम सामना हा ११ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत पश्चिम विभाग संघाचे नेतृत्व शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंना मात्र बीसीसीआयने या बाहेरचा रस्ता दाखवल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शार्दुलच्या नेतृत्वाखाली श्रेयस अय्यर अन् ऋतुराजसह खेळताना दिसणार हे स्टार
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पश्चिम विभाग संघात श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, सरफराज खान आणि तुषार देशपांडे या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व पहिल्यांदाच शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
अजिंक्य रहाणे अन् पुजारा संघाबाहेर
पश्चिम विभागाच्या निवड समितीने BCCI च्या राष्ट्रीय निवड समितीशी चर्चा करून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संघाबाहेर ठेवल्याचे समजते. दोन्ही अनुभवी फलंदाज राष्ट्रीय संघातून वगळल्यावरही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत होते. आता या खेळाडूंसाठी कसोटी प्रारुपातील देशांतर्गत क्रिकेटचे दरवाजेही बंद झाल्याचे दिसते.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभाग संघ -
शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे. धरमेंद्रसिंग जडेजा, सौरभ नवले, हरविक देसाई (विकेट किपर बॅटर), आर्या देसाई, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, अरझान नगवास्वाला.