Join us  

रातोरात शेन वॉर्न झाला करोडपती; धोनी, विराटपेक्षाही केली बिग डील...

या डीलमुळे वॉर्नने भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांनाही मागे टाकल्याची चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 4:29 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न हा २००६ सालीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर वॉर्नने आयपीएलमध्येराजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले आणि संघाला पहिल्याच मोसमात जेतेपद मिळवून दिले. पण वॉर्न आणि राजस्थानच्या संघामध्ये एक अनोखं डील झालं आहे. या डीलमुळे वॉर्न हा एका रात्रीतच करोडपती झाला आणि सध्याच्या घडीला त्याची मिळकत वाढतंच चालली आहे. या डीलमुळे वॉर्नने भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांनाही मागे टाकल्याची चर्चा आहे. ही बिग डील नेमकी आहे तरी काय...

वॉर्नने २००६ आंतरराष्ट्री क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर वॉर्नला क्रिकेट खेळायचं नव्हतं. पण २००७ साली आयपीएल सुरु झाले आणि त्यामधील राजस्थान रॉयल्सच्या संघाला आपल्या संघात वॉर्न कर्णधार म्हणून हवा होता. वॉर्न सुरुवातीचा यासाठी तयार नव्हता. पण त्यानंतर राजस्थानचे मालक आणि वॉर्न यांच्यामध्ये एक मोठा करार झाला. या करारामुळे वॉर्नची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

बीसीसीआयसाठी आयपीएल ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे म्हटले जाते. पण आयपीएलमध्ये खरी लॉटरी वॉर्नला लागल्याचे म्हटले जात आहे. कारण राजस्थानने त्याच्याबरोबर जी डील केली आहे, अशी कोणत्याही खेळाडूबरोबर केली नसल्याचे म्हटले जात आहे.

वॉर्नने आपल्या संघात यावे, यासाठी राजस्थानचे मालक त्याचा मागेच लागले होते. अखेर राजस्थानच्या मालकांनी वॉर्नपुढे एक प्रस्ताव ठेवला आणि त्यानुसार सध्या त्याची संपत्ती वाढतच चालल्याचे दिसत आहे. वॉर्नने कर्णधारपद स्वीकारावे यासाठी राजस्थानच्या मालकांनी त्याला पाच कोटी रुपये दिले. पण ही डील एवढ्यावरच थांबली नाही.

वॉर्नने राजस्थानच्या संघात येण्यासाठी एका वर्षासाठी पाच कोटी रुपये घेतले. त्याचबरोबर राजस्थानच्या मालकी हिस्साही वॉर्नला मिळाला आहे. प्रत्येक वर्षी वॉर्नला संघाच्या मालकीमधील ०.७५ टक्के हिस्सा मिळतो. दिसायला ही टक्केवारी छोटी वाटत असली तरी त्याची किंमत फार मोठी आहे. आतापर्यंत वॉर्नने आयपीएलमधून ४५ कोटी कमावले आहेत, पण पुढच्या वर्षी ही किंमत त्याची हिस्सेदारी पाहता ८५ कोटी रुपये होऊ शकते. न खेळताही वॉर्न सध्या धोनी आणि कोहलीपेक्षा आयपीएलमधून जास्त कमावतो, असे म्हटवे जात आहे. 

टॅग्स :आयपीएलराजस्थान रॉयल्सविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनी