नवी दिल्ली : वादात अडकलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा आगामी इंडियन प्रीमियर लीगमधील सहभाग बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे(एसीयू) प्रमुख नीरज कुमार यांच्या चौकशी अहवालावर अवलंबून राहील, असे बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी आज स्पष्ट केले.
प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी नीरज कुमार यांना या क्रिकेटपटूवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. शमीची पत्नी हसीनने या गोलंदाजावर ब्रिटनच्या व्यापाऱ्याकडून पाकिस्तानी महिलेच्या माध्यमातून पैसे घेतल्याचा आरोप केला होता.
कार्यकारी अध्यक्ष खन्ना यांनी आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीनंतर बोलताना सांगितले की,’एसीयू प्रमुख नीरज कुमार चौकशी करीत आहेत. त्यांना सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेता येईल.अंतिम निर्णय सीओएतर्फे घेण्यात येईल.’ शमीला दिल्ली डेअरडेव्हिल्सने तीन कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. हसीनने कौटुंबिक वाद व व्याभिचारचा आरोप केल्यानंतर बीसीसीआयने यापूर्वीच शमीचा केंद्रीय करार रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
संचालन परिषदेच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या अन्य निर्णयांमध्ये आयपीएलच्या उद््घाटन समारंभाच्या आयोजनासाठी १८ कोटी रुपयांची रक्कम निर्धारित केली आहे. खन्ना म्हणाले, ‘बीसीसीआयच्या अर्थ समितीने उद््घाटन समारंभासाठी १८ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे, पण या समारंभासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.’
आयपीएल प्ले आॅफचे यजमानपद पुणेला बहाल करण्यात आले अस्न राजकोट व लखनौ येथील नवनिर्मित स्टेडियम्सला ‘स्टॅन्डबाय’ ठेवण्यात आले आहे. डागडुजीसाठी चंदीगड विमानतळ बंद राहणार असल्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाब संघाने यापूर्वीच काही निश्चित कालावधीसाठी त्यांच्या लढतींचे स्थळ बदलण्याची विनंती केली आहे. (वृत्तसंस्था)
>अन्य निर्णय...७ एप्रिल रोजी होणाºया उद््घाटन समारंभादरम्यान सर्व ८ फ्रेन्चायसी संघाचे कर्णधार प्रत्येक वेळेप्रमाणे उपस्थित राहतील. विशेषत: दुसºया दिवशी खेळल्या जाणाºया लढतींमध्ये सहभागी होणाºया संघांचे कर्णधार या कार्यक्रमात सहभागी राहत नव्हते.
तसेच बीसीसीआयने कर्करोगाबाबत पूर्व तपासणीसंदर्भात सामाजिक कार्यक्रमासाठी टाटा ट्रस्टसोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे.