Join us  

शाहिद आफ्रिदीच्या घरी आहे सोन्याची बंदूक; पण कशासाठी ठेवलीए, पाहा खास व्हिडीओ...

या व्हिडीओमध्ये त्याने ही सोन्याची बंदुकही दाखवली आहे. पण ही बंदक कशासाठी ठेवली आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, त्यासाठी हा खास व्हिडीओ बघायलाच हवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 7:03 PM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा नेहमीच चर्चेत असतो. काही वेळेला तो ट्रोल होते, तर काही वेळेला त्याची स्तुतीही होते. पण सध्याच्या घडीला आफ्रिदी चर्चेत आला आहे तो त्याच्या घरातील एका सोन्याच्या बंदुकीमुळे. आफ्रिदीने आपल्या घराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ही सोन्याची बंदुकही दाखवली आहे. पण ही बंदक कशासाठी ठेवली आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, त्यासाठी हा खास व्हिडीओ बघायलाच हवा...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकिय संबंध कसे आहेत, हे वेगळं सांगायला नको. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि काश्मीर मुद्दावरून या देशांतील संबंध अधिक ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून सातत्यानं काश्मीर मुद्दा उपस्थित करून भावना भडकावण्याचं काम सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधूल कलम 370 आणि कलम 35A हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा तीळपापड झाला होता. पाकिस्तानचे क्रिकेटपटूंनीही अकलेचे तारे तोडले आहेत. त्यात शाहिद आफ्रिदी आघाडीवर आहे. 

आफ्रिदीनं काश्मीर मुद्यावर नुकतेच एक ट्विट केलं. पण, यावेळी त्याला भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीरने नाही तर सध्याचा सलामीवीर गब्बर शिखर धवननं धारेवर धरलं. नुकतेच धवननं पाकिस्तानी राजकारण्यांना स्वतःच घर सांभाळा असा सल्ला दिला होता. 33 वर्षीय धवन म्हणाला होता की,''जर कोणी आमच्या देशाबद्दल वाईट बोलत असेल, तर त्याच्या विरोधात आम्ही नक्कीच उभे राहू. आम्हाला बाहेरच्यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. पहिले तुमच्या देशातील समस्या सोडवा आणि नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकवा. जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंकते.'' 

आता गब्बरनं आफ्रिदीच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. आफ्रिदीनं ट्विट केलं की,''भारतव्याप्त काश्मीरमधली परिस्थिती दिवसेंदिवस भयानक आणि चिंताजनक होत चालली आहे. निरापधारांना मारले जात आहे. यूएन आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्था का डोळे झाकून बसल्या आहेत, हेच कळत नाही.'' 

आफ्रिदीच्या या ट्विटला गब्बरने उत्तर दिले. त्यानं लिहिले,''प्रथम स्वतःच्या देशातील हालत सुधरा. तुमचे विचार तुमच्याकडेच ठेवा. आमच्या देशात आम्ही जे करतोय ते चांगलेच आहे आणि भविष्यात काय करायचेय हेही आम्हाला चांगले माहित आहे. जास्त डोकं लावू नका.''

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तान