Join us  

... म्हणून शाहीद आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात कोहली हा एकमेव भारतीय!

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा संघ अकरा जणांचा संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 5:51 PM

Open in App

लाहोर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा संघ अकरा जणांचा संघ जाहीर केला. विशेष म्हणजे त्याने जाहीर केलेल्या संघात महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या या संघात पाकिस्तानचेच पाच खेळाडू आहेत, ऑस्ट्रेलियाचे चार आणि भारत व दक्षिण आफ्रिका यांचा प्रत्येकी एक खेळाडू आहे. विराट कोहली हा एकमेव भारतीय या संघात आहे. 

सर्वाधिक धावा करणाऱ्या तेंडुलकरचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तेंडुलकरने 19 वर्षांच्या क्रिकेट क्रिकेट कारकिर्दीत सहा वर्ल्ड कप स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने वर्ल्ड कपमध्ये 44 डावांत 56.95च्या सरासरीने 2278 धावा केल्या आहेत. त्यात 16 अर्धशतकांचा व 6 शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप उंचावला होता. धोनीने वर्ल्ड कप स्पर्धेतील 17 डावांत 42.25च्या सरासरीने 507 धावा केल्या आहेत. 

पण, आफ्रिदीच्या या संघात स्थान पटकावणारा एकमेव भारतीय खेळाडू हा कोहली आहे. कोहलीनं वर्ल्ड कप स्पर्धेत 17 डावांत 41.92च्या सरासरीनं 587 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतकं आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. 2019चा वर्ल्ड कप हा त्याचा तिसरा वर्ल्ड कप आहे. आपल्या संघात कोहलीला का घेतलं, याचा उलगडा आफ्रिदीनं केला. तो म्हणाला,''तेंडुलकर व धोनी हे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांचे भारतीय क्रिकेटसाठीचे योगदान अमुल्य आहे. मी कोहलीची निवड केली, कारण त्याला फलंदाजी करताना पाहताना मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते.'' 

भारत-पाकिस्तान यांच्यातील ताण क्रिकेटच कमी करू शकतो...भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील ताण मिटवण्यासाठी क्रिकेट मालिका हा पर्याय आहे. दोन देशांमध्ये पुन्हा क्रिकेट मालिका सुरू झाल्यास दोन्ही देशांतील लोकांना समजून घेण्याची संधी मिळेल, असे मत आफ्रिदीने व्यक्त केले. 

शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड कप संघः सईद अन्वर, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, इंझमाम उल-हक, जॅक कॅलिस, वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, शोएब अख्तर, साकलेन मुश्ताक.  

टॅग्स :शाहिद अफ्रिदीविराट कोहलीसचिन तेंडुलकरमहेंद्रसिंग धोनी