Join us  

Lanka Premier League : ४० वर्षीय शाहिद आफ्रिदीचे २० चेंडूंत अर्धशतक, नोंदवला विक्रम; पण...

हंम्बाटोंटाच्या मोठ्या ग्राऊंडवर षटकार मारणे म्हणजे मोठं आव्हानच... त्यातही आफ्रिदीनं लंका प्रीमिअर लीगमधील त्याच्या पहिल्याच सामन्यात दमदार खेळ केला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 28, 2020 10:20 AM

Open in App

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं ४०व्या वर्षीही तुफान फटकेबाजी करताना क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. लंका प्रीमिअर लीगमध्ये गॅल ग्लॅडिएटर संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या आफ्रिदीनं २० चेंडूंत अर्धशतक झळकावून संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला, परंतु जाफ्ना स्टॅलिअन्सच्या विआ फर्नांडोच्या तुफानी खेळीनं आफ्रिदीच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. जाफ्ना संघानं ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

हंम्बाटोंटाच्या मोठ्या ग्राऊंडवर षटकार मारणे म्हणजे मोठं आव्हानच... त्यातही आफ्रिदीनं लंका प्रीमिअर लीगमधील त्याच्या पहिल्याच सामन्यात दमदार खेळ केला. त्यानं २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आफ्रिदीनं ३ चौकार व ६ षटकारांच्या मदतीनं २३ चेंडूंत ५८ धावा केल्या. गुणथिलका ( ३८) आणि पी राजपक्षा ( २१) यांनी त्याला साथ देताना ग्लॅडिएटर संघाला ८ बाद १७५ धावा करून दिल्या. १५ षटकांत ग्लॅडिएटरच्या ९८ धावाच होत्या. आफ्रिदीच्या वादळी खेळीच्या जोरावर संघानं अखेरच्या पाच षटकांत ७७ धावा चोपल्या.  पण, जाफ्नाकडून फर्नांडोनं ६३ चेंडूंत नाबाद ९२ धावा करताना ग्लॅडिएटरवर विजय मिळवला. शोएब मलिकनं नाबाद २७ धावा केल्या.   आशियातील सर्व ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे.  इंडियन प्रीमिअर लीग २००८श्रीलंका प्रीमिअर लीग २०१२बांगलादेश प्रीमिअर लीग  २०१२-१९पाकिस्तान सुपर लीग २०१६-२०अफगाणिस्तान प्रीमिअर लीग २०१८लंका प्रीमिअर लीग - २०२० 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीश्रीलंकापाकिस्तान