Join us  

कोरोना पॉझिटिव्ह शाहिद आफ्रिदीचा नवा व्हिडीओ व्हायरल; म्हणतो, 'त्या' सर्व अफवा!

माजी फलंदाज तौफीक उमर याच्यानंतर कोरोनाची लागण झालेला आफ्रिदी हा पाकिस्तानचा दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:15 AM

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यानं मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. त्यानं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे जाहीर करताना सर्वांना प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करा असं आवाहनही केलं. पण, मागील काही दिवसांपासून आफ्रिदीची प्रकृती खालावल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर आफ्रिदीचा एका व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यानं प्रकृती खालावल्याच्या अफवा असल्याचे स्पष्ट केले. 

निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!

जगभरात कोरोना रुग्णाची संख्या 84 लाख 06,084 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 51,387 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 60,118 इतका पोहोचला आहे. त्यापैकी 59, 215 रुग्ण बरे झाले आहेत आणि 3093 जणांचा मृत्यू झाला आहे. आफ्रिदीनं बुधवारी फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड केला आणि त्यात त्यानं त्याच्या प्रकृतीची माहिती दिली. कोरोना व्हायरस झाला असला तरी प्रकृती सुधारत असल्याचे त्यानं सांगितले. यावेळी त्यानं कोरोनावर मात करण्याचा पर्यायही सूचवला.

माजी फलंदाज तौफीक उमर याच्यानंतर कोरोनाची लागण झालेला आफ्रिदी हा पाकिस्तानचा दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. उमरनं कोरोनावर मात केली आहे. आफ्रिदीनं म्हटलं की,''मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे मी हा व्हिडीओ पोस्ट करत आहे. पहिले 2-3 दिवस हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते, परंतु आता माझी प्रकृती सुधारत आहे. मला माझ्या मुलांची आठवण येत आहे. पण, सध्या स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचे आहे.''

लॉकडाऊनच्या काळात विविध ठिकाणी मदत कार्य करत असताना कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलो असल्याचे मत त्यानं व्यक्त केलं. शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन पाकिस्तानात विविध ठिकाणी जाऊन मदत कार्य करत होते. तो म्हणाला,''चॅरिटीच्या कामासाठी विविध ठिकाणी जात असताना मला कोरोना झाला असावा. पण, कोरोनाची उशीरा लागण झाली हे बरंच झालं. अन्यथा मला लोकांना मदत करता आली नसती.'' 

शहीद जवानाचे वडील म्हणाले, नातवंडांनाही लढायला पाठवणार... वीरूने केला 'बापमाणसा'ला सलाम

कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार! 

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानकोरोना वायरस बातम्या