Join us

...म्हणून शाहरूख खानने मागितली टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजची माफी

अभिनेता शाहरूख खान लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.  'टेड टॅाक्स इंडिया' या टॅाक शोमध्ये शाहरुख सूत्रसचांलन करणार आहे. दरम्यान, शाहरूख खानने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिची माफी मागितली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 13:55 IST

Open in App

मुंबई, दि. 25 - अभिनेता शाहरूख खान लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.  'टेड टॅाक्स इंडिया' या टॅाक शोमध्ये शाहरुख सूत्रसचांलन करणार आहे. दरम्यान, शाहरूख खानने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिची माफी मागितली आहे. आपल्या एका खराब सवयीमुळे त्याला मितालीची माफी मागावी लागली.  'टेड टॅाक्स इंडिया' या शोच्या पहिल्या भागात शाहरूखचा खास मित्र करण जोहर व भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हे हजेरी लावणार आहेत.याच्या चित्रिकरणासाठी मिताली सेटवर वेळेत पोहोचली होती. पण शाहरूख आणि करण हे ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल तीन ते चार तास उशीरा आले. चित्रिकरणासाठी सगळ्यांनी एकाच वेळी पोहोचणं अपेक्षित होतं. पण शाहरूख आणि करणला तीन ते चार तास उशीर झाल्याने मितालीला खूप वेळ वाट बघावी लागली. त्यामुळे चित्रिकरणस्थळी पोहोचल्यावर शाहरूखने सर्वप्रथम मिताली राजची माफी मागितली. त्यानंतर शाहरूखने मुलाखतीची तयारी करण्यास मितालीची मदत केली. मितालीवरचं दडपण कमी करून त्याने चित्रिकरणाला सुरुवात केली. या टॉक शोच्या पहिल्या भागात चेजिंग रिलेशनशिप्स (बदलते नातेसंबध) या विषयावर मिताली व करण बोलताना दिसणार आहेत.