Join us

मालिका विजयासाठी द. आफ्रिका सज्ज

चेंडूशी छेडछाड केल्याच्या प्रकरणात वादात सापडलेल्या आॅस्ट्रेलिया संघाविरोधात मालि

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 04:27 IST

Open in App

जोहान्सबर्ग : चेंडूशी छेडछाड केल्याच्या प्रकरणात वादात सापडलेल्या आॅस्ट्रेलिया संघाविरोधात मालिका विजयासाठी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मैदानात उतरतील. दक्षिण आफ्रिका या मालिकेत २-१ ने पुढे आहे.दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी खेळाडूंना आधीच इशारा दिला आहे की, वॉर्नर,स्मिथ आणि बेनक्राफ्ट यांच्या शिवायदेखील आॅस्ट्रेलियन संघ कडवे आव्हान उभे करू शकतो.’गिब्सन म्हणाले की, ‘त्यांचे मनोबल निश्चितच कमी झाले असेल. मात्र तरीही त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. मी त्यांच्या वेगवान गोलंदाजीचा चाहता आहे.’ १९६९-७० नंतर पहिल्यांदा आॅस्टेÑलियाचा द. आफ्रिकेविरुद्ध मालिका वाचवण्याचा प्रयत्न असेल.’ स्मिथ, वॉर्नर, बेनक्राफ्ट यांच्या जागी मॅट रेनशॉ, जो बर्न्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे.