Join us  

...त्यासाठी ही मालिका योग्यच

अनेकांना दिल्ली कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारत विजयी होईल असे वाटत होते, पण आता ती वेळ निघून गेली आहे. श्रीलंकेने लढत अनिर्णीत राखण्यात यश मिळवले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:39 AM

Open in App

- सौरभ गांगुलीअनेकांना दिल्ली कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारत विजयी होईल असे वाटत होते, पण आता ती वेळ निघून गेली आहे. श्रीलंकेने लढत अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. सिनिअर खेळाडू अँजेलो मॅथ्यूज व कर्णधार दिनेश चंडीमल यांनी पहिल्या डावात शतक झळकावले, तर ज्युनिअर्सनी दुस-या डावात चमकदार कामगिरी करीत संघाला लढत अनिर्णीत राखून दिली.भारताने हिरवळ असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळण्याला प्राधान्य देताना या मालिकेचा उपयोग दक्षिण आफ्रिका दौºयाच्या तयारीच्या दृष्टीने केला. भारताने पाच गोलंदाजांना खेळविण्याच्या रणनीतीला अर्धविराम देत रोहित शर्माला संधी दिली आणि विदेशातील मालिकेसाठी तयारी केली.रोहितनेही चमकदार कामगिरी करीत छाप सोडली. विदेशात खेळतानाही तो कामगिरीत सातत्य राखेल, अशी आशा आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव, भुवनेश्वर आणि ईशांतनेही फॉर्मात असल्याचे सिद्ध करीत दक्षिण आफ्रिका संघाला तेथील उसळी घेणाºया खेळपट्यांवर भारतीय गोलंदाज रविचंद्रन आश्विनच्या साथीने २० बळी घेण्यास सक्षम असल्याचा इशारा दिला आहे.विराट कोहलीचा फलंदाजीतील फॉर्म केपटाऊन, जोहान्सबर्ग आणि सेन्चुरियन येथील खेळपट्ट्यांवरही कायम राहणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. मुरली विजय व शिखर धवन लढवय्या खेळीसाठी सक्षम आहेत. विजय प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यापूर्वी त्यांची धार बोथट करतो तर धवन सुरुवातीपासून त्यांच्यावर हल्ला चढवितो. सलामीची जोडीनंतर संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणारा पुजारा तिसºया क्रमांकावर खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचे आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचे दिसून येते. होय, अजिंक्य रहाणेचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय असू शकतो, पण त्याची प्रतिभा बघता त्याला लवकरच सूर गवसेल, असा विश्वास आहे.कोहलीने आवश्यक असलेला ब्रेक घेतल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे व टी-२० मालिकेत नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारतीय संघात काही नवे चेहरे आहेत. नव्या चेहºयांना संधी देण्यासाठी ही चांगली मालिका आहे. रोहितने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व योग्यपणे सांभाळले. त्यामुळे त्याला या पातळीवर संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म नेहमीच उत्तम असतो आणि तो नक्कीच संघाला उत्तम नेतृत्व प्रदान करेल.श्रीलंका संघही नवा कर्णधार व नव्या प्रशिक्षकासह खेळणार आहे. दिनेश चंडीमल संघात नसणे श्रीलंका संघासाठी योग्य निर्णय नाही. नवा कर्णधार व नवे प्रशिक्षक संघात नवी ऊर्जा निर्माण करतील, अशी आशा असून तिसºया कसोटीच्या अखेरच्या दिवशी केलेली लढवय्या फलंदाजीही संघाला नवी उभारी देईल, अशी आशा आहे.श्रीलंका संघात काही नव्या दमाचे युवा खेळाडू आहेत. या मालिकेत त्यांची कामगिरी कशी ठरते, याबाबत उत्सुकता आहे. संक्रमणाच्या स्थितीतून लवकर सावरणे श्रीलंकेसाठी लाभदायक ठरेल. (गेमप्लान)

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ