कराची : ‘आमचा राष्ट्रीय संघ १६ जून रोजी होणाऱ्या विश्वचषक सामन्यात भारताविरुद्ध स्पर्धेतील सहा पराभवांची मालिका खंडित करण्यास सक्षम आहे,’ असा विश्वास पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल-हक यांनी व्यक्त केला. पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत अद्याप भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.
इंजमाम म्हणाले, ‘लोक भारत-पाक लढतीला गांभीर्याने घेतात. अनेकजण म्हणतात की, जर आम्ही भारताविरुद्ध विश्वचषक स्पर्धेत जिंकण्यात यशस्वी ठरलो तरी आनंद होईल.’ इंजमाम पुढे म्हणाले, ‘विश्वचषक स्पर्धेचा अर्थ केवळ भारताविरुद्ध होणारी लढत नाही. पाकिस्तान संघात अन्य संघांनाही पराभूत करण्याची क्षमता आहे.’