नागपूर : फिरकीपटू पार्थ रेखडेच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विदर्भाने अंडर २३ कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत मुंबईला २९४ धावांनी पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. गतवर्षी साखळी फेरीत बाहेर झालेल्या विदर्भाची ही भरघोस कामगिरी ठरली.
कळमना मैदानावर विदर्भाने पहिल्या डावात ३३१ धावा उभारल्या. मुंबईला १५४ धावांत गुंडाळल्याने यजमान संघाला १७७ धावांची आघाडी मिळाली. दुसºया डावात २२१ धावांची भर घालणाºया विदर्भाने मुंबईला ३९९ धावांचे लक्ष्य दिले. मात्र, मुंबई संघ १०४ धावांतच गारद झाला.
विजयाचा पाठलाग करणाºया मुंबईचा सलामीवीर जय बिश्त (३४) आणि चिन्मय सुतार (३१) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज पार्थ रेखडेच्या माºयापुढे चाचपडले. ५८ धावांत त्यांचा अर्धा संघ बाद होताच विदर्भाने विजयाकडे कूच केली. एस. मुलानीने (१७) धावा करीत काही वेळ प्रतिकार केला, तरीही पाहुणा संघ १०४ धावांत बाद झाला. पार्थने ३६ धावांत सहा, तसेच राज चौधरी व अथर्व देशपांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
> संक्षिप्त धावफलक
विदर्भ (पहिला डाव) : सर्वबाद ३३१ मुंबई (पहिला डाव) : सर्वबाद १५४ विदर्भ (दुसरा डाव ६५.४ षटकांत सर्वबाद २२१) मुंबई (दुसरा डाव) : ३५.१ षटकांत सर्वबाद १०४ (जय बिश्त ३४, चिन्मय सुतार ३१. राज चौधरी २/२१, पार्थ रेखडे ६/३६)
>विदर्भ-केरळ उपांत्य लढत
लागोपाठ दुसºया वर्षी उपांत्य फेरीत धडक देणाºया विदर्भाची उपांत्य सामन्यात केरळविरुद्ध गाठ पडेल. केरळने उपांत्यपूर्व लढतीत गुजरातला ११३ धावांनी पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. २४ ते २८ जानेवारी या कालावधीत रंगणारा हा उपांत्य सामना पाच दिवसाचा असेल.