Join us

सेहवाग खुश हुआ! 'गॉड ऑफ क्रिकेट'ने दिलं 1 कोटी 14 लाखांचं स्पेशल गिफ्ट

क्रिकेट जगतात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या जोडीने केलेली धमाल प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहितीये. दोघं फलंदाजीसाठी उतरले की गोलंदाजाला घाम फुटायचा आणि धावांचा पाऊस पडायचा. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:54 IST

Open in App

मुंबई - क्रिकेट जगतात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या जोडीने केलेली धमाल प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहितीये. दोघं फलंदाजीसाठी उतरले की गोलंदाजाला घाम फुटायचा आणि धावांचा पाऊस पडायचा. सेहवाग आणि सचिन चांगले पार्टनरच नाही तर खूप चांगले मित्र देखील आहेत. म्हणूनच की काय मैदानावरून निवृत्ती घेतल्यानंतरही दोघांची मैत्री अजूनही कायम आहे.

सचिन तेंडुलकरने आपल्या या बॅटिंग पार्टनरला नुकतंच एक स्पेशल आणि महागडं गिफ्ट दिलं आहे. त्याने सेहवागला बीएमडब्ल्यू 7 सिरीजची एक कार गिफ्ट केली आहे. तब्बल 1.14 कोटी रूपये इतकी या कारची किंमत आहे. 250 किमी प्रतितास इतका या गाडीचा वेग आहे. सेहवागने ट्विट करून याबाबत माहिती दिली आणि सचिन तेंडुलकर व बीएमडब्ल्यू इंडियाचे आभार मानले आहेत. 

 

टॅग्स :सचिन तेंडूलकरक्रिकेट