Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या कसोटीसाठी तिरिमानेचा श्रीलंका संघात समावेश

श्रीलंकेने भारताविरुद्ध ३ आॅगस्टपासून खेळल्या जाणाºया दुसºया कसोटी सामन्यासाठी दुखापतग्रस्त असलेल्या गुणरत्नेच्या स्थानी डावखुरा फलंदाज लाहिरू तिरिमानेचा संघात समावेश केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:27 IST

Open in App

कोलंबो : श्रीलंकेने भारताविरुद्ध ३ आॅगस्टपासून खेळल्या जाणाºया दुसºया कसोटी सामन्यासाठी दुखापतग्रस्त असलेल्या गुणरत्नेच्या स्थानी डावखुरा फलंदाज लाहिरू तिरिमानेचा संघात समावेश केला.तिरिमाने वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून श्रीलंका कसोटी संघातून बाहेर आहे. त्याने जून २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. श्रीलंका संघातील नजिकच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार फिरकीपटू लक्षण संदाकन याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. सुरंगा लकमल पाठदुखीमुळे या लढतीत खेळणार नसल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)नुवान प्रदीप व लाहिरू कुमारा आता श्रीलंका संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. संदाकन संघात समावेश करण्यात आलेला चौथा प्रमुख फिरकीपटू आहे. रंगना हेराथ, दिलरुवान परेरा आणि मालिंदा पुष्पकुमारा यांचा संघात समावेश आहे. कर्णधार दिनेश चंदीमल या लढतीत पुनरागमन करणार आहे. तिरिमानेने आतापर्यंत २६ कसोटी सामने खेळताना १०५६ धावा फटकावल्या आहेत. त्यात १५५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. बांगलादेशविरुद्ध २०१३ मध्ये गाले कसोटी सामन्यात त्याने ही खेळी केली होती.श्रीलंका संघदिनेश चंदीमल (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, निरोशन डिकवेला, कुसाल मेंडिस, धनंजय डिसिल्वा, धनुष्का गुणतिलक, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, नुवान प्रदीप, रंगना हेराथ, दिलरूवान परेरा, मालिंदा पुष्पकुमारा, लक्षण संदाकन आणि लाहिरू तिरिमाने.