Join us  

यंदा हजारे, दुलिप आणि देवधर करंडक स्पर्धा रद्द व्हाव्या- जाफर

कोरोनामुळे क्रिकेट सुरू करण्यासाठी बीसीसीआयने वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका अवलंबली असून क्रिकेट सुरू होईल तेव्हा आयपीएल आयोजनास प्राधान्य असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 1:37 AM

Open in App

मुंबई : कोरोना महामारीमळे यंदा दुलिप करंडक, विजय हजारे करंडक आणि देवधर करंडक क्रिकेटचे आयोजन रद्द करण्यात यावे. या वेळेचा सदुपयोग रणजी करंडक आणि मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी व्हावा, असे मत माजी सलामीवीर आणि स्थानिक क्रिकेटचा बादशाह वसीम जाफर याने व्यक्त केले आहे.स्थानिक सत्राची सुरुवात आॅगस्टमध्ये होण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे क्रिकेट सुरू करण्यासाठी बीसीसीआयने वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका अवलंबली असून क्रिकेट सुरू होईल तेव्हा आयपीएल आयोजनास प्राधान्य असेल.बीसीसीआय सुरुवातीलाच या स्पर्धेचे आयोजन करू शकते. आयपीएल आटोपल्यानंतर इराणी ट्रॉफीचे आयोजन होऊ शकेल. सौराष्टÑ पहिल्यांदा चॅम्पियन बनल्याने हा सामना खेळणे त्यांचा हक्क आहे.यानंतर रणजी करंडकाची सुरुवात होईल. पुढील वर्षीच्या आयपीएल लिलावाआधी बीसीसीआय मुश्ताक अली स्पर्धा आयोजनास प्राधान्य देईल. व्यस्त वेळापत्रक राहणार असल्याने यंदा हजारे, दुलिप करंडक आणि देवधर करंडकाचे आयोजन रद्द करावे. यामुळे खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळू शकेल, असे जाफर म्हणाला.(वृत्तसंस्था)‘खेळाडू तयारी करू शकतील आणि विश्रांतीही घेऊ शकतील, अशा तºहेने यंदाच्या सत्राचे आयोजन केले जावे. सर्व स्पर्धा घाईघाईत आटोपण्याऐवजी खेळाडूंची विश्रांती हादेखील मुद्दा आहे. त्यासाठी विजय हजारे आणि दुलिप करंडकाचे आयोजन होऊ नये, असे माझे मत आहे. ‘रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व लढतीपासून अडचणी दूर करण्याचा बीसीसीआयने प्रयत्न करायला हवा,’अशी मागणीदेखील जाफरने केली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या