Join us  

RCB ची जर्सी घालू नकोस, म्हणणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला Scott Styris चे ओपन चॅलेंज 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ मध्ये १ विजय मिळवला आहे आणि त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उरलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकावे लागणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 8:47 PM

Open in App

IPL 2024 - सनरायझर्स हैदराबादच्या ३ बाद २८७ धावांचा ( आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम) पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारता आली. या पराभवानंतर RCB ची गाडी गुणतालिकेत पुन्हा तळाच्या क्रमांकावर घसरली आहे.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ मध्ये १ विजय मिळवला आहे आणि त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उरलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकावे लागणार आहेत. पण, या पराभवानंतर न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस ( Scott Styris ) चर्चेत आला आहे. 

RCB हा त्याचा आवडता संघ आहे आणि म्हणून जिओ सिनेमासाठी समालोचन करताना तो RCBच्या सामन्यात या संघाचीच जर्सी घालतेला दिसतो. पण, स्कॉटची हे प्रेम त्याच्यावर उलटल्याचे दिसतेय. नशीब न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडूला अनुकूल वाटत नाही. त्याने RCB ची जर्सी घातल्यामुळे संघासाठी पनवती ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात RCB चा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स यानंही कृपया RCB ची जर्सी घालू नकोस अशी विनंती स्कॉटला केली.  

त्याने असा दावा केला की जर फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाने विजय मिळवावा असे त्याला वाटत असेल तर स्कॉटने त्यांच्या आगामी सर्व सामन्यांच्यावेळी आरसीबीची जर्सी घालू नये. पण, त्याला स्कॉटने चॅलेंज दिले की, मी असं करायला तयार आहे आणि त्यानंतरही RCB हरले तर पुढच्या सामन्यात एबीने चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घालायला हवी.  

टॅग्स :आयपीएल २०२४एबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरऑफ द फिल्ड