Join us  

बांगलादेशने सौम्य सरकारला संघातून केले ‘आऊट’

तीन देशांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेआधी दोन सामन्यांत बांगलादेशचा हा आघाडीचा फलंदाज प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:00 AM

Open in App

ढाका : बांगलादेश क्रिकेट मंडळाने सोमवारी आघाडीचा फलंदाज सौम्य सरकार याला बाहेर करून मायदेशात सुरूअसलेल्या सध्याच्या टी२० मालिकेसाठी तीन नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.तीन देशांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेआधी दोन सामन्यांत बांगलादेशचा हा आघाडीचा फलंदाज प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. तिसऱ्या आणि चौथ्या लढतीसाठी फलंदाज मोहंमद नईम, अमिनुल इस्लाम आणि नजमुल हुसैन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या सामन्यात बांगलादेशने ६० धावांत त्यांचे ६ फलंदाज गमावले होते. तथापि, हा सामना ते ३ विकेटने जिंकण्यात यशस्वी ठरले होते. अफगाणिस्तानविरुद्धही बांगलादेशने ४ फलंदाज गमावले होते आणि ही लढत ते त्यांनी २५ धावांनी गमावली. यादरम्यान सौम्य सरकार याने २ सामन्यात फक्त ४ धावा केल्या. वेगवान गोलंदाज रुबेल हुसैन आणि शफीउल इस्लाम यांनादेखील संघात समाविष्ट करण्यात आले आहे, तर मेहंदी हसन आणि यासिन अराफात यांना संघातून ‘आऊट’ करण्यात आले आहे.बांगलादेशचा संघ :शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, शब्बीर रहमान, मोसद्देक हुसैन, लिटन दास, अफिफ हुसैन, तईजुल इस्लाम, रुबेल हुसैन, शफीउल इस्लाम, मुस्ताफिजुर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन, मोहम्मद नईम, अमीनुल इस्लाम आणि नजमुल हुसैन.

टॅग्स :बांगलादेश