Join us  

संतोषकुमार घोष ट्रॉफी क्रिकेट : संजीवनी, अचिव्हर्सचे दणदणीत विजय

अचिव्हर्स क्रिकेट अकादमी, केआरपी इलेव्हन आणि अखिलेश क्रिकेट अकादमी यांनी विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 9:49 PM

Open in App
ठळक मुद्देशिवाजी पार्कवर सुरू असलेल्या स्पर्धेत यश रावतच्या गोलंदाजीने कमाल केली. त्याने 17 धावांत आघाडीचे 4 फलंदाज गारद केल्यामुळे संजीवनी क्रिकेट अकादमीने काऊंटी क्रिकेट क्लबचा डाव 79 धावांत गुंडाळला. त्याअगोदर संजीवनीने आदित्य बालीवाडाच्या तडाखेबंद 56 धावांच्या जोरावर 13धावा फलकावर लावल्या होत्या.

मुंबई :  यश रावतने अवघ्या 17 धावांत टिपलेल्या 4 बळींच्या जोरावर संजीवनी क्रिकेट अकादमीने यजमान काऊंटी क्रिकेट क्लबचा 51 धावांनी पराभव करून 12 वर्षाखालील मुलांच्या संतोष कुमार घोष क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली.  तसेच आज झालेल्या पहिल्या फेरीच्या अन्य सामन्यात अचिव्हर्स क्रिकेट अकादमी, केआरपी इलेव्हन आणि अखिलेश क्रिकेट अकादमी यांनी जोरदार विजयाची नोंद केली.

शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या स्पर्धेत यश रावतच्या गोलंदाजीने कमाल केली. त्याने 17 धावांत आघाडीचे 4 फलंदाज गारद केल्यामुळे संजीवनी क्रिकेट अकादमीने काऊंटी क्रिकेट क्लबचा डाव 79 धावांत गुंडाळला. त्याअगोदर संजीवनीने आदित्य बालीवाडाच्या तडाखेबंद 56 धावांच्या जोरावर 13धावा फलकावर लावल्या होत्या. अचिव्हर्स क्रिकेट अकादमीने हिंदकला संघाचा डाव 95 धावांवर रोखला आणि आज्ञेय आडी आणि श्रवण म्हात्रे यांनी नाबाद 65 धावांची भागी रचत 16 व्या षटकांतच 2 फलंदाजांच्या मोबदल्dयात विजयी लक्ष्य गाठले.

संक्षिप्त धावफलक

हिंदकला क्रिकेट अकादमी- 20 षटकांत 7 बाद 95 ( आर्यन परूळकर 38, शौर्य सरण ; वेदांत मयेकर 10 धावांत 3 बळी, रघुवेद सावंत 10 धावांत3 बळी)पराभूत वि. अचिव्हर्स क्रिकेट अकादमी - 16 षटकांत 2 बाद 96 ( आग्नेय आडी ना. 32, श्रवण म्हात्रे ना. 30)

संजीवनी क्रिकेट अकादमी- 20 षटकांत सर्वबाद 130 ( आदित्य बालीवाडा 56, ओमकार पाटणकर 32 ; अर्पित श्रीवास्तव 26 धावांत 2 बळी) वि. वि. काऊंटी क्रिकेट क्लब -20 षटकांत सर्वबाद 79 ( आर्य गांधी 33, भावेश चव्हाण 25 ; यश रावत 17 धावांत 4 बळी, 18 धावांत 3 बळी)

केआरपी इलेव्हन - 20 षटकांत सर्वबाद 130 ( अभिज्ञान पुंदर 30, हादी अब्दुल 29, प्रणव सावंत 27 ; सौरिश देशपांडे 21 धावांत 3 बळी, कृष्णा सात्विक 24 धावांत 2 बळी, रोहण हाबळे 12 धावांत 2 बळी) वि. वि. भोसले क्रिकेट अकादमी - 20 षटकांत 8 बाद 63 ( सौरिश देशपांडे 25,पृथ्वी गोवरी 20 ;  मन भानुशाली 10 धावांत 2 बळी, आदित्य खटका 5 धावांत 2 बळी, अंकित यादव 6 धावांत 2 बळी)

सावंत क्रिकेट अकादमी - 20 षटकांत 5 बाद 106 (प्रितेश चटवान 48, श्रेयस सानप 29 ; तौरिश कनौजिया 29 धावांत 3 बळी, कार्तिक सोलंकी21 धावांत 2 बळी) वि. वि. अखिलेश क्रिकेट अकादमी- 18.2 षटकांत सर्वबाद 79 ( निरज निशाद 31, हर्ष पाठक ना. 24 ; लोकेश मिस्त्री 11धावांत 3 बळी, अयान अंसावी 8 धावांत 3 बळी, आराध्य माने 11 धावांत 2 बळी)

टॅग्स :मुंबई