इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून शुभमन गिलकडे भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. तर, ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनला पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. गेल्या काही काळापासून त्याने खूप चांगली कामगिरी केली, ज्याचे फळ त्याला मिळाले. दरम्यान, भारतीय कसोटी संघात स्थान मिळाल्यानंतर साई सुदर्शनने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय कसोटी संघात स्थान मिळाल्याबद्दल साई सुदर्शन म्हणाले की, मला वाटते की, एखाद्या क्रिकेटपटूने देशासाठी खेळणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. ही एक अद्भुत, खास आणि अविश्वसनीय भावना आहे. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा असते, जे त्याचे अंतिम लक्ष्य असते.
शुभमन गिल कर्णधार झाल्याबद्दल साई सुदर्शन म्हणाले की, "मी त्याला गेल्या चार वर्षांपासून खेळताना पाहत आहे. शुभमन गिल उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ निश्चितच चांगली कामगिरी करेल. त्याच्या नेतृत्वाखाली मी माझी पहिली कसोटी मालिका खेळणार आहे, याचा मला आनंद आहे."
आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक धावा
आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत साई सुदर्शन पहिल्या क्रमांकावर आहे. चालू हंगामात खेळल्या गेलेल्या १३ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत ६३८ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून एक शतक आणि पाच अर्धशतके झळकली आहेत.
Web Title: Sai Sudharsan mentally and skilfully ready to bat anywhere for India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.