Join us  

जे सांगितलं त्याच्या उलट केलं म्हणून सचिनने वीरुला दिल्या वाढदिवसाच्या 'उलटया' शुभेच्छा

भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी क्रिकेटच्या मैदानावरुन निवृत्ती घेतली असली तरी या दोघांमध्ये आजही घनिष्ठ संबंध आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 2:08 PM

Open in App

मुंबई - भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी क्रिकेटच्या मैदानावरुन निवृत्ती घेतली असली तरी या दोघांमध्ये आजही घनिष्ठ संबंध आहेत. सलामीवीर म्हणून दोघांनी अनेक सामन्यांमध्ये एकत्र डावाची सुरुवात केली आहे. 2003 च्या वर्ल्डकप स्पर्धेत सचिन आणि सेहवागने सर्वाधिक धोकादायक सलामीवीरांची जोडी म्हणून दबदबा निर्माण केला होता. 

डावाच्या मध्यावर सेहवागला जे आवडते ते तो करु शकतो असे सचिनने सेहवागबद्दल म्हटले होते. सेहवागचा आज 39 वा वाढदिवस असून या निमित्ताने सचिनने त्याला टि्वटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने केलेल्या टि्वटचे वैशिष्टय म्हणजे सचिनने उलटे टि्वट करुन वीरुला बर्थ डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

हॅप्पी बर्थ डे, वीरु तुझ्या नव्या वर्षाची सुरुवात झोकात होऊं दे, मी जेव्हा तुला मैदानावर काही सांगितले नेहमी तू त्याच्या उलट केलेस, त्यामुळे माझ्याकडून तुला या उलटया शुभेच्छा असे टि्वट सचिनने केले आहे. आक्रमक फलंदाजीमुळे सेहवाग जागतिक क्रिकेटमधील एका धोकादायक फलंदाज होता. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने स्वत:चा दबदबा निर्माण केला होता. 

कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. दोन त्रिशतके झळकवण्याचा विक्रम फक्त चौघांच्या नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक द्विशतक सेहवागच्या नावावर आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा सेहवाग दुसरा फलंदाज आहे. 

सचिनने सेहवागला दिली बीएमडब्ल्यू 7 सिरीजची कार

मागच्या महिन्यात सचिन तेंडुलकरने आपल्या या बॅटिंग पार्टनरला एक स्पेशल आणि महागडं गिफ्ट दिलं. त्याने सेहवागला बीएमडब्ल्यू 7 सिरीजची एक कार गिफ्ट केली आहे. तब्बल 1.14 कोटी रूपये इतकी या कारची किंमत आहे. 250 किमी प्रतितास इतका या गाडीचा वेग आहे. सेहवागने ट्विट करून याबाबत माहिती दिली आणि सचिन तेंडुलकर व बीएमडब्ल्यू इंडियाचे आभार मानले. 

टॅग्स :विरेंद्र सेहवाग