Join us

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला संघात मिळाले स्थान, आता 'या' सामन्यात खेळणार

पंधरा सदस्यीय संघाची घोषणा आज करण्यात आली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:22 IST

Open in App

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची मुंबईच्या संघात निवड केली गेली आहे. आज मुंबईच्या संघाची निवड करण्यात आली. यावेळी अर्जुनला संघात स्थान देण्यात आले आहे. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

विदर्भामध्ये मोसमाच्या सुरुवातीला ‘बापुना कप’ ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेसाठी मुंबईच्या पंधरा सदस्यीय संघाची घोषणा आज करण्यात आली. या संघात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनला स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा 20 षटकांची खेळवली जायची, पण यंदाच्या वर्षापासून ही स्पर्धा 50 षटकांची खेळवण्यात येणार आहे.

मुंबईचा संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, जय बिस्टा, सर्फराज खान, शुभम रांजणे, रोनक शर्मा, एकनाथ केरकर, सूफियाँन शेख, आकाश पारकर, शम्स मुलानी, आदित्य धुमाळ, शशांक अटार्डे, आकिब कुरेशी, कृतिक हनागावाडी आणि अर्जुन तेंडुलकर.