Join us  

सचिनची क्रेझ अजूनही कायम, चाहत्याने केली 'ही' स्पेशल गोष्ट

निवृत्तीनंतर तब्बल आठ वर्षांनीही एका चाहत्याने सचिनला खास भेट दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 4:07 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने 2011 साली निवृत्ती जाहीर केली. पण गेल्या आठ वर्षांमध्ये सचिनची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. कारण निवृत्तीनंतर तब्बल आठ वर्षांनीही एका चाहत्याने सचिनला खास भेट दिली आहे. या चाहत्याने सचिनवर खास एक लायब्ररी बनवली आहे. या लायब्ररीमध्ये तब्बल सचिनवरील तब्बल 60 पुस्तकांचा समावेश आहे.

हे चाहते आहे केरळमधील एक प्रोफेसर. मालाबार क्रिश्चियन कॉलेजमध्ये ते इतिहास हा विषय शिकवतात. वशिष्ट मणिकोठ हे त्यांचे नाव. वशिष्ट हे सचिनचे फार मोठे चाहते आहेत. पण त्यांनी या गोष्टीचा कधीही गैरफायदा घेतला नाही. सचिनच्या प्रेमापोटी त्यांनी सचिनवरील बऱ्याच गोष्टी जमा केल्या.

सचिनवरील 60 पुस्तकं जमा केल्यावर त्यांनी एक लायब्ररी सुरु केली. या लायब्ररीमधील 60 पुस्तके 11 विविध भाषांमध्ये आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्यालम, कन्नड, गुजराती अशा विविध भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. वशिष्ट यांच्या लायब्ररीची सध्या देशामध्ये चर्चा सुरु आहे. युवा पिढीचा चांगला प्रतिसाद या लायब्ररीला मिळत आहे.

भारत खेळांवर प्रेम करणारा नव्हे, खेळणारा देश व्हावा:सचिन तेंडुलकर‘भारत हा केवळ खेळावर प्रेम करणारा नव्हे तर खेळ खेळणारा देश व्हावा. युवा, तंदुरुस्त आणि सुदृढ भारत घडविण्यासाठी खेळावर प्रेम करणारा ते खेळ खेळणारा देश हे स्थित्यंतर येण्याचे काम प्रत्येक नागरिकांनी करायला हवे,’ असे आवाहन दिग्गज क्रिकेटपटू,‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने शनिवारी नागपुरात केले. आपले हेच स्वप्न असल्याचे सचिनने सांगताच उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा गजर करीत सचिनला जोरदार साथ दिली.

इतर देशांच्या तुलनेत भारतात आरोग्याचे प्रश्न मोठे असल्याचे सांगून सचिन म्हणाला,‘आम्ही खेळांवर प्रेम तर करतो, पण खेळत नसल्याने आरोग्याच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. युवा असणे याचा अर्थ फिट असणे असा नाही. खेळाच्या माध्यमातून आयुष्याला शिस्त लावण्याचे काम प्रत्येकाने केलेच पाहिजे. आम्ही सुदृढ राहू आणि इतरांनादेखील प्रोत्साहन देऊ, हा मंत्र पेरण्यासाठी राजदूत बनायला हवे. आरोग्यसंपन्न जीवनमान ठेवायचे झाल्यास इतकेच म्हणेन की खेळत राहा..., खेळत राहा...’

टॅग्स :सचिन तेंडुलकरवाचनालय