Join us  

सचिनचे सर्व विश्वविक्रम कोहली मोडू शकतो, सांगतोय एक महान क्रिकेटपटू

एकेकाळी सचिनने हे सारे विश्वविक्रम आपल्या नावावर केले होते. आता यापुढे कोहलीच्या नावावर सर्व विश्वविक्रम असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 8:36 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार हा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयसीसीच्या पुरस्कारामध्ये कोहलीचीच धुम पाहायला मिळाली. आता तर एका महान क्रिकेटपटूने, कोहली हा सचिनचे सर्व विश्वविक्रम मोडू शकतो, असे वक्तव्य केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या 2018च्या कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व कोहलीच्या खांद्यावर सोपवण्यात आले. त्याचबरोबर वर्षातील सर्वोत्तम खेळाडूला दिली जाणारी सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी त्याने पटकावली. सोबतच वर्षातील सर्वोत्तम कसोटी व वन डे खेळाडूचा पुरस्कारही त्याने नावावर केला. एकाच वर्षी हे तिन्ही पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

कोहलीने या 2018 वर्षात 13 कसोटी सामन्यांत 55.08च्या सरासरीने 1322 धावा केल्या आहेत आणि त्यात पाच शतकांचा समावेश आहे. 14 वन डे सामन्यांत त्याने 133.55 च्या सरासरीने 1202 धावा चोपून काढल्या. वन डेत त्याने मागील वर्षात सहा शतकं ठोकली, तर 10 ट्वेंटी-20 सामन्यांत त्याने 211 धावा केल्या. दिल्लीचा 30 वर्षीय कोहली 2008 मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्याने 2008 साली भारताला 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर वरिष्ठ संघात त्याने यशाचे एक एक शिखर पादाक्रांत केले.

पाकिस्तानचे माजी महान क्रिकेटपटू झहीर अब्बास म्हणाले की, " कोहली हा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे क्रिकेटमधले सर्व विश्वविक्रम तो मोडू शकतो. एकेकाळी सचिनने हे सारे विश्वविक्रम आपल्या नावावर केले होते. आता यापुढे कोहलीच्या नावावर सर्व विश्वविक्रम असतील. " 

टॅग्स :विराट कोहलीसचिन तेंडुलकर