Join us  

सचिन तेंडुलकरने दिल्या सिंधूला शुभेच्छा

आपल्या २३व्या वाढदिवशी विजय मिळवणाऱ्या भारताच्या पी.व्ही. सिंधूला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुकरने शुभेच्छा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 9:02 PM

Open in App
ठळक मुद्देसिंधूने १७व्या मानांकित ओहोरीला २१-१७, २१-१४ असे सहज  पराभूत केले आणि आपल्या वाढदिवसाला विजयाचे कोंदण लावले.

मुंबई : आपल्या २३व्या वाढदिवशी विजय मिळवणाऱ्या भारताच्या पी.व्ही. सिंधूला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुकरने शुभेच्छा दिल्या आहेत. इंडोनेशियन स्पर्धेत सिंधूने आपल्या वाढदिवशी विजय मिळवत स्वत:लाच अनोखी भेट दिली आहे.

सचिनने ट्विटरवर सिंधूला शुभेच्छा देताना म्हटले आहे की, " आज खास दिवशी चांगली बातमी मिळाली. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्याबद्दल तुझे अभिनंदन आणि वाढदिवसाबद्दल शुभेच्छा. स्पर्धेत यापुढेही तुला यश मिळो, हीच इच्छा. " 

सिंधू सध्या इंडोनेशियामध्ये जकार्ता बॅडमिंटन स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत आज तिचा सामना होता तो जपानच्या आया ओहरीबरोबर. या सामन्यात सिंधूने १७व्या मानांकित ओहोरीला २१-१७, २१-१४ असे सहज  पराभूत केले आणि आपल्या वाढदिवसाला विजयाचे कोंदण लावले.

टॅग्स :सचिन तेंडूलकरपी. व्ही. सिंधूक्रिकेटBadminton